ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले, पण तो शतकापासून थोड्या अंतरावर असताना दुर्दैवाने बाद झाला. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वॉर्नरने ९४ धावा केल्या.यासह ऑस्ट्रेलिया संघाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे पारडे अधिक जड बनवले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३४३ धावा केल्या आणि इंग्लंडवर १९६ धावांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान वॉर्नरने पहिल्या डावात केलेल्या खेळीनंतर स्वतःच्या नावावर नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
वॉर्नने पहिल्या डावात एकूण १७६ चेंडूंचा सामना केला आणि ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९४ धावा केल्या. वॉर्नरने जर या सामन्यात शतक केले असते, तर हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २५ वे शतक असते. वॉर्नर शतकी खेळीला मुकला असला, तरी या त्याला सामन्यात अगोदर एकदा जीवनदान मिळाले होते. त्याला मिळालेल्या या जीवनदानामुळे तो ९४ धावांचा टप्पा गाठू शकला.
१७ धावांसह खेळपट्टीवर खेळत असताना बेन स्टोक्सच्या चेंडूवर वॉर्नर त्रिफळाचीत झाला होता. पण तो चेंडू नो बॉल असल्याचे समोर आल्यानंतर सुदैवाने वॉर्नरला जीवनदान मिळाले होते. त्यानंतर त्याने ही मोठी खेळी केली.
दरम्यान ही पाचवी वेळ आहे, जेव्हा वॉर्नर नो बॉलवर बाद झाला आणि त्यानंतर मोठी धावसंख्या साकारली. २०१४ मध्ये भारताविरुद्ध सामन्यात तो असाच नो बॉलवर बाद झाला होता. त्यावेळी तो ६६ धावांसह खेळपट्टीवर खेळत होता आणि जीवनदान मिळाल्यानंतर त्याने १४५ धावांची खेळी केली. २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याला ८१ धावांवर जीवनदान मिळाले होते आणि नंतर त्याने १४४ धावांची खेळी केली होती.
तसेच २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध ९९ धावांवर वॉर्नरला जीनवदान मिळाले होते आणि नंतर त्याने १०३ धावा केल्या होत्या. २०१९ मध्ये त्याला पुन्हा पाकिस्तानविरुद्ध खेळताना ५६ धावांवर जीवनदान मिळाले होते आणि नंतर १५४ धावांची खेळी केली होती. आता या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले.
या सामन्यापूर्वीच्या वॉर्नच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर ती अप्रतिम आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८६ कसोटी सामन्यांतील १५९ डावांमध्ये ४८ च्या सरासरीने ७३११ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २४ शतकांचा आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच नाबाद ३३५ धावांच्या खेळीचा देखील समावेश आहे. तसेच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ आणि टी-२० क्रिकेटमध्ये एक शतक केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘धन्यवाद कॅप्टन…’ नेटकऱ्यांनी कान उपटल्यानंतर बीसीसीआयला जाग, विराटच्या आभारासाठी केले खास ट्विट
‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणेसाठी देवाप्रमाणे धावून आला ‘हा’ दिग्गज! नाहीतर कसोटी कारकिर्द आली असती संपुष्टात
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडची कसोटीत वनडेप्रमाणे खेळी..! तेज तर्रार शतकासह बनला ‘विक्रमवीर’