इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023 स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा पहिला डाव 53.3 षटकात 237 धावांवरच संपुष्टात आला. यासोबतच ऑस्ट्रेलियाला 26 धावांची आघाडी मिळाली. यावेळी इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स यानेच अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज खास कामगिरी करू शकला नाही. तसेच, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक 6 विकेट्स आपल्या खिशात घातले. (England all out 237 runs in 3rd test at leeds)
इंग्लंडसाठी चमकला कर्णधार स्टोक्स
इंग्लंडकडून फलंदाजी करताना कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने सर्वाधिक धावांची खेळी साकारली. त्याने यावेळी 108 चेंडूंचा सामना करताना 80 धावा केल्या. या धावा करताना त्याने 5 षटकार आणि 6 चौकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर झॅक क्राऊले (33), मार्क वूड (24) आणि मोईन अली (21) यांनी संघासाठी 20हून अधिक धावांचे योगदान दिले. या खेळाडूंव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही.
Australia claim four wickets in the morning session!#WTC25 | #ENGvAUS ????: https://t.co/CIqx6cW10r pic.twitter.com/7n6CL2ieYl
— ICC (@ICC) July 7, 2023
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) चांगलाच चमकला. त्याने 18 षटके गोलंदाजी करताना 91 धावा खर्चून सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मिचेल स्टार्क याने 2, तर मिचेल मार्श आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
ऑस्ट्रेलियाकडून मार्शचे वादळी शतक
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघासाठी मिचेल मार्श (Mitchell Marsh) या अष्टपैलू खेळाडूने शानदार फलंदाजी केली. त्याने यावेळी 118 चेंडूंचा सामना करताना 118 धावा केल्या. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 17 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त ट्रेविस हेड (39), स्टीव्ह स्मिथ (22) आणि मार्नस लॅब्यूशेन (21) या खेळाडूंना मोलाचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त एकही खेळाडू 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. या खेळाडूंच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 10 विकेट्स गमावत 263 धावा केल्या होत्या.
यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना मार्क वूड (Mark Wood) याने उच्च दर्जाची गोलंदाजी केली. त्याने 11.4 षटके गोलंदाजी करताना 34 धावा खर्चून 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ख्रिस वोक्सने 3, तर स्टुअर्ट ब्रॉड याने 2 विकेट्स नावावर केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
विकेट्सचं पंचक! हेडिंग्ले कसोटीत पॅट कमिन्सने उडवला इंग्लिश फलंदाजांचा धुव्वा
बॉल फेकतोय की भाला! तिसऱ्या Ashes कसोटीत मार्क वूडने केला रेकॉर्ड, माजी कर्णधारही झाला फिदा