पुणे। मॅरेथॉन शर्यतीत आपला वेगळा ठसा उमटविणारे, प्रदीर्घ काळ सायकलिंग करणारे बास्केटबॉलपटू पुणेकर आशिष कासोदेकर यांनी आज अल्ट्रा डायनामो या सर्वाधिक सलग 60दिवस(दररोज 42.195किमी) अंतर धावण्याचा नवा जागतिक विक्रम नोंदविला असून विक्रमाची नोंद गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
याआधी काल आशिष यांनी इटली, ट्यूरिनच्या एन्झो कॅपोरासोचा विक्रम मोडीत काढला. एन्झो याने 2019मध्ये 14 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत हा विक्रम नोंदविला होता.
फिट इंडिया मूव्हमेंटच्या माध्यमातून आशिष कासोदेकर यांनी आतापर्यंत 28 नोव्हेंबर 2021 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या परिसरात सलग 60दिवस(दरदिवशी 42.195किमी अंतर) धावून यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
आज, 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनी आशिष कासोदेकर सकाळी 9 वाजता आपल्या जागतिक विक्रमाला गवसणी घातली. याप्रसंगी भारतीय ऍथलिट शायनी अब्राहीम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, ट्रॅव्हल टाईमचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह संस्थापक विवेक काळकर, कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, किशोर ठक्कर, उपकुलगुरु एन एस उमराणी, अल्ट्रा डायनामोचे संस्थापक व स्पर्धा संचालक अरविंद बिजवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जागतिक विक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या आशिष कासोदेकर आनंद व्यक्त करताना म्हणाले की, हा विक्रम पूर्ण करून मला खूप आनंद झाला आहे. या 60 दिवसांमध्ये माझ्यासोबत असणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यामुळे मला रोज धावण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळायची. यादरम्यान कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी या माझ्या मोहिमेला उत्साहवर्धक पाठिंबा दिला आहे. माझे हे स्वप्न पूर्ण करताना मला सर्वांनी दिलेली साथ अत्यंत मोलाची ठरली. तसेच, सतत बदलत असलेल्या वातावरण, येणारा पाऊस याचा अडथळा मी माझ्या कामगिरीत होऊ दिला नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे. या प्रवासादरम्यान आव्हानांना कसे आनंदाने पार करायचे हे मी शिकत गेलो आणि हीच ऊर्जा मला आगामी वाटचालीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे क्रमवारी: भारताच्या विराट कोहली, रोहित शर्माला मोठे नुकसान, पाहा कोण कितव्या स्थानावर