आयपीएलमधील आपल्या पहिल्या दोन हंगामात गुजरात टायटन्सची कामगिरी अतिशय उत्कृष्ट राहिली होती. संघानं दोन्ही हंगामात फायनलमध्ये प्रवेश केला, ज्यापैकी एकदा विजेतेपदही पटकावलं. मात्र आयपीएल 2024 मध्ये गुजरातचा संघ या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात गुजरात प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकला नाही. त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या भविष्याबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सचा संघ आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल करू शकतो.
‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, गुजरात टायटन्सचं मॅनेजमेंट सध्या संघाचे प्रशिक्षक बदलण्याचा विचार करत आहे. संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये क्रिकेटचे संचालक म्हणून विक्रम सोलंकी, मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा आणि मार्गदर्शक म्हणून गॅरी कर्स्टन यांचा समावेश होता. गॅरी कर्स्टननं आधीच फारकत घेतली आहे. ते सध्या पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचे प्रशिक्षक आहेत.
रिपोर्टनुसार, विक्रम सोलंकी सध्या आपल्या पदावर कायम राहू शकतात. परंतु आशिष नेहराच्या भवितव्याबद्दल शंका आहे. आयपीएलच्या 2024 सीझनमध्येही नेहरा लाइव्ह टीव्हीवर फारसा दिसला नाही. परंतु तो 2022 आणि 2023 सीझनमध्ये टीमच्या खेळाडूंना सतत टिप्स देताना दिसत असे.
‘इकॉनॉमिक टाईम्स’नं आपल्या एका वृत्तात सांगितलं होतं की, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी गुजरात टायटन्समधील हिस्सा खरेदी करू शकतात. इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी गुजरात टायटन्स मधील कंट्रोलिंग स्टेक विकण्यासाठी अदानी टोरेंट ग्रुप आणि सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स या खाजगी इक्विटी फर्मशी बोलणी करत आहे. गुजरात टायटन्सचं बाजारमूल्य एक अब्ज डॉलर ते दीड अब्ज डॉलर्स दरम्यान आहे. 2021 मध्ये CVC ने 5,625 कोटी रुपयांची बोली लावून ही फ्रेंचाइजी खरेदी केली होती.
हेही वाचा –
“आपल्या देशात फक्त क्रिकेटलाच प्राधान्य…”, पॅरिस ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर सायनाने व्यक्त केली खदखद
बाबरनं केलं सुवर्णपदक विजेत्या अर्शदचं अभिनंदन…! तरीही चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल
“माझं नाव हटवा, मला खूप काम आहेत” इंग्लंडचा प्रशिक्षक बनण्यासाठी इच्छुक नाही ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ दिग्गज