दिल्ली । भारतीय संघाने काल इतिहासात प्रथमच न्यूजीलँड संघावर टी२०मध्ये विजय मिळवला. त्यानंतर कर्णधार कोहलीने संघाच्या अष्टपैलू कामगिरीसाठी कौतुक केले.
या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
कर्णधार कोहलीने वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या निरोप समारंभाबद्दल समाधान व्यक्त केले. नेहराने खूप कष्ट घेतले आहे आणि असा निरोप समारंभ आयोजित करणे हा त्याचा खरा गौरव असल्याचे विराट म्हणाला.
नेहरा विराटला बक्षीस देतानाच्या एका फोटोबद्दल विचारले असता विराट म्हणाला, ” तो फोटो २००३ मधला आहे. जेव्हा नेहरा २००३ विश्वचषक खेळून परत भारतात आला होता. मी तेव्हा १३ वर्षांचा होतो आणि शाळेच्या संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होतो. “
“वेगवान गोलंदाजाने १९ वर्ष आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवणे ही खूप अवघड गोष्ट आहे. तो एक व्यावसायिक आणि कठोर मेहनत घेणारा खेळाडू आहे. त्याला असा निरोप मिळणे हेच उचित आहे. तो आता त्याच्या सुंदर परिवारासोबत चांगला वेळ व्यतीत करू शकतो. मी त्याला शुभेच्छा देतो आणि कायम आमी संपर्कात राहू. मला नेहराची संघात कायम कमी जाणवेल. ” थोडासा भावनिक झालेला विराट म्हणाला.
https://twitter.com/imVkohli/status/925788929718145026