भारताचा माजी वेगवान गोलंदाज अशीष नेहराने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इशांत शर्माला गोलंदाजी करताना चेंडूच्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
“इशांतने गोलंदाजीत सातत्य आणि आखूड टप्प्यांच्या चेंडूमध्ये बदल केल्यास त्याचा इशांतला लाभ होईल.”
“या मालिकेत इशांतने सातत्याने चेंडूचा टप्पा पुढे ठेवायला पाहीजे. जर चेंडूचा टप्पा पुढे ठेवण्यात इशांत यशस्वी झाला तर अॅलिस्टर कुकसह बाकीच्या फलंदाजांना शांत ठेवण्यात भारत यशस्वी ठरेल.” एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेहराने हे मत व्यक्त केले.
“इशांत सध्याच्या भारतीय संघात असलेल्या वेगवान गोलंदाजांपैकी सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना इशांतकडून खूप अपेक्षा असणार आहेत.” असे अशीष नेहरा पुढे म्हणाला.
भारत इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून (१ ऑगस्ट) प्रारंभ होत आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-खेळात मैत्री नाहीच! आयपीएलमधील मैत्री विसरुन हा खेळाडू आता काढणार भारतीय गोलंदाजांची पिसे
-इंग्लंडचाच माजी गोलंदाज म्हणतो, टीम इंडियाला भुवीची कमतरता जाणवणार नाही






