दिल्ली । काल भारताची दिल्ली एक्सप्रेस आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. हा खेळाडू भारताकडून तब्बल १८ वर्ष आणि २५० दिवस क्रिकेट खेळला.
यापुढे नेहरच्या नावापुढे माजी वेगवान गोलदांज हा शब्द कायमस्वरूपी जोडला जाणार आहे. अशा या खेळाडूच्या पदार्पणाच्या वेळीची ही आकडेवारी नक्कीच काही खास आहे.
-नेहराने जेव्हा आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तेव्हा जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये केवळ सुनील गावसकर आणि अॅलन बॉर्डर या दोनच खेळाडूंनी १०,००० हजार धावा केल्या होत्या. आज १३ खेळाडूंनी १० हजार धावांचा टप्पा कसोटीत पार केला आहे.
-जेव्हा नेहराने पदार्पण केले तेव्हा वनडेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर होता. त्याने ८८६८ धावा वनडेत केल्या होत्या. आज वनडेत ११ खेळाडूंनी १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
-कपिल देव तेव्हा कसोटीत सार्वधिक विकेट्स (४३४) घेणारा खेळाडू होते. आज ६ खेळाडूंनी कसोटीत ५०० विकेट्सचा टप्पा पार केला आहे.
-तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने केवळ एक ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. आज त्यांच्याकडे ५ विश्वचषक आहेत.