भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबर पासून ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर- गावसकर मालिका होणार आहे. या बहुप्रतिक्षित मालिकेपूर्वी भारतीय संघासमोर सलामीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मयंक अगरवाल हा सलामीला निश्चित मानला जात असताना त्याच्या सोबत पृथ्वी शॉ, शुबमन गिल व केएल राहुल या तिघांपैकी एकाला संधी मिळू शकते. अनेक क्रिकेट पंडित सलामीला कोणता फलंदाज असावा याबद्दल आपापले विचार मांडत आहेत. याचदरम्यान भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने सलामीसाठी केएल राहुलला पसंती दिली आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नेहराने मयंकसोबत राहुलला सलामीला निवडत एक वेगळाच मुद्दा चर्चेत आणला आहे. आशिष नेहराच्या मते, “कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मयंकसोबत डावाची सुरुवात कोण करेल ही समस्या आहे. संघ व्यवस्थापन गिल व शॉ यांना संधी देवू शकतो. पण माझ्यामते राहुलला संधी द्यावी. राहुल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे व आपल्या कामगिरीने तो ही सलामीची समस्या दूर शकतो.”
आशिष नेहराने राहुलला सलामीसाठी निवडले आहे, मात्र भारतीय संघाने कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात त्याला अंतिम ११ मध्ये संधी दिलेली नाही. भारतीय संघाने तीन दिवसीय २ सराव सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात गिल व शॉ दोघेही अपयशी ठरले. मात्र दुसऱ्या सराव सामन्यात दोघांनीही अवघड परिस्थितीत धावा बनवल्या आहेत.
शॉने पहिल्या डावात ४०, तर दुसऱ्या डावात केवळ ३ धावा बनवल्या. गिलने पहिल्या डावात ४३ व दुसऱ्या डावात ६५ धावांची खेळी केली आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की भारतीय संघात सलामीसाठी कोणत्या खेळाडूला संधी दिली जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
“इशांत शर्माची ‘ही’ खासियत, म्हणूनच भारतीय संघ त्याला शंभर टक्के मिस करेल”
“शुबमन गिलने सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करावी”, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला
दुःखद! ‘या’ महान क्रिकेटपटूला झाला पितृशोक, आजारपणामुळे वडिलांचे निधन
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! कांगारूविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘या’ चार भारतीय खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी