भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर हा सामना खेळला जाईल. भारतीय क्रिकेटसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असून, भारतीय संघ विजय मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. तत्पूर्वी, भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज व समालोचक आशिष नेहरा याने भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाविषयी महत्त्वाचे विधान केले आहे.
आशिष नेहराचे महत्त्वपूर्ण विधान
भारताचा माजी वेगवान गोलंदाज व सध्या समालोचक म्हणून काम करणारा आशिष नेहरा याने एका मुलाखतीत बोलताना भारताच्या इंग्लंडवर असणाऱ्या वेगवान गोलंदाजांविषयी आपली मते व्यक्त केली.
पहिल्या सामन्यात भारताचे गोलंदाजी आक्रमण कसे असेल, याबाबत बोलताना तो म्हणाला, “मला वाटते की दुखापती नसतील तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व इशांत शर्मा हे पहिल्या सामन्यात उतरतील. त्यांच्या स्थानाला सध्या तरी काही धोका नाही. चौथा वेगवान गोलंदाज खेळवायचा ठरल्यास उमेश यादव किंवा मोहम्मद सिराज यापैकी एकाची फॉर्म कसा आहे, या निकषावर निवड होईल.”
जून महिन्यात झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ बुमराह, शमी व इशांत या तिकडीसह मैदानात उतरला होता.
हे आहेत पर्याय
इंग्लंडमध्ये असलेला भारतीय संघाकडे सध्या बुमराह, शमी, इशांत, उमेश व सिराज यांच्या व्यतिरिक्त शार्दुल ठाकूर हा देखील पर्याय आहे. सोबतच, राखीव गोलंदाज म्हणून गेलेला प्रसिद्ध कृष्णा हा देखील गरज पडल्यास उपलब्ध असेल. दुसरा राखीव गोलंदाज आवेश खान सराव सामन्यात जखमी झाल्यामुळे भारतात परतला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, अभिमन्यू ईस्वरन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, वृद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
सक्रिय भारतीय संघातील ‘या’ फलंदाजाने इंग्लंडला चांगलंच धुतलंय, बाहेरच नव्हे मायभूमीतही दिलाय चोप
कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, ‘हा’ वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर
जागतिक विक्रम करत सुवर्णपदक जिंकलेल्या ‘त्या’ खेळाडूने चक्क सुपरमॅनसारखी फाडली जर्सी, पाहा व्हिडिओ