---Advertisement---

पहिल्या प्रयत्नात १९.९९ चा थ्रो, नंतर सलग दोन फाऊल; तजिंदरपाल सिंग पडला ऑलिंपिकमधून बाहेर

On: मंगळवार, ऑगस्ट 3, 2021 6:18 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) शेवटचा भारतीय ऍथलिट म्हणून पुरुषांच्या शॉट पुट स्पर्धेत ग्रूप एमधील क्वालिफिकेशनमध्ये तजिंदरपाल सिंग टूरने भाग घेतला होता. यामध्ये त्याने निराश केले. तसेच तो ऑलिंपिकमधून बाहेर पडला आहे.

तजिंदरपालने पहिल्या प्रयत्नात १९.९९ मीटरचा थ्रो केला होता. मात्र, तो २१.२० मीटरच्या पात्रता मार्कपर्यंतचे अंतर गाठू शकला नाही. यावेळी थ्रो करणाऱ्या ऍथलिट्समध्ये ब्राझीलचा दार्लन रोमानीच केवळ २१.०० मीटरपर्यंतचा थ्रो करू शकला, तर सर्बियाच्या अरमिन सिनॅन्सेव्हिकने २०.५० मीटरचा थ्रो केला. (Tajinderpal Singh Toor fails to qualify for Men’s Shot Put final event after he finished 13th in Group A qualification)

यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तजिंदरपालने फाऊल थ्रो केला. पुढे तिसऱ्या प्रयत्नातही त्याने फाऊल थ्रो केला. यामुळे त्याच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या.

तजिंदरपालने पहिल्या प्रयत्नात १९.९९ मीटर थ्रो केला. मात्र, पुढील दोन्ही प्रयत्नात त्याने फाऊल थ्रो केले. यामुळे त्याची १३ व्या क्रमांकावर घसरण झाली. या स्पर्धेत केवळ १२ ऍथलिट ग्रूप ए आणि ग्रूप बी क्वालिफिकेशनमध्ये मिळून फायनलमध्ये पोहोचतील. यांपैकी एक स्थान ब्राझीलच्या दार्लनने आधीच २१.३१ मीटरचा थ्रो करत मिळवले आहे. यासह आता तजिंदरपाल अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे.

शॉट पुटच्या क्वालिफिकेशन राऊंडला दोन गटात विभाजले आहे. प्रत्येक गटात १६ खेळाडू आहेत. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये प्रत्येक खेळाडूला ३ प्रयत्न मिळतात. ३२ खेळाडूंपैकी अंतिम फेरीत प्रवेश करतात.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-अरेरे! भालाफेक खेळात क्लालिफायर्समधील खराब प्रदर्शनामुळे अन्नू राणी ऑलिंपिकमधून बाहेर

-हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत

-दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---