गोवा । देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळलेल्या आशिष नेहराने गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता भारतातील सुसेगाड राज्यात अर्थात गोव्यात राहणार आहे.
काही दिवसांपुर्वीच भारताच्या या माजी दिग्गज गोलंदाजाने आपण दिल्लीतील प्रदुषणाला कंटाळलो असल्याचे सांगितले होते तसेच दिल्ली हे आता शहर राहिले नसून गॅस चेंबर झाला असल्याचे वक्तव्य केले होते.
काही महिन्यांपुर्वीच या दिग्गज खेळाडूने येथील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
नेहराने गोव्यातील पर्वरी परिसरात एक बंगला भाड्याने घेतला आहे. हा बंगला गोव्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांच्या घराशेजारीच आहे. यासाठी नेहरा भाडेकरु नोंदणी फॉर्म नेण्यासाठी नुकताच पर्वरी पोलिस स्टेशनमध्ये आला होता.
नोव्हेंबर २०१७मध्ये दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळून तो मुंबईत स्थलांतरीत झाला. परंतु तिथे मन रमेनासे झाल्यानेच त्याने आता गोव्यात येण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या नेहरा विराट कोहलीच्या राॅयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुंबईकर पृथ्वी शाॅ ठरला ११ मोसमातील अनेक खेळाडूंना सरस
–IPL 2018: आव्हान राखण्यासाठी मुंबईला आजचा विजय महत्त्वाचा
–Video: पहा सचिन तेंडूलकर, एमएस धोनीपोठीपाठ मुंबईकर पृथ्वी शॉचा हेलिकॉप्टर शॉट!
–कॅप्टन म्हणून खेळला पहिलाच सामना, परंतू विक्रमांचा केला महा धमाका
–भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर