नॉटिंगहॅम येथे झालेल्या एकमेव महिला ऍशेस कसोटीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने आले. ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात जबरदस्त पुनरागमन करताना 89 भावाने विजय मिळवला. विशेष म्हणजे तब्बल आठ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्यात यश आले. अखेरच्या डावात 8 बळी घेणारी अष्टपैलू ऍश्ले गार्डनर सामन्याची मानकरी ठरली.
Gardner’s eight-wicket haul ✨
Wyatt’s debut milestone ????Australia landed the first blow in the Women’s #Ashes in an outstanding Test in Nottingham ????#ENGvAUShttps://t.co/dIFIhCglQi
— ICC (@ICC) June 26, 2023
ट्रेंट ब्रिज मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार बेथ मूनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी अनुभवी एलिस पेरीने 99 व ताहलिया मॅकग्राने 61 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी अष्टपैलू ऍनी सदरलॅंड हिने 137 धावांची दमदार खेळी करताना ऑस्ट्रेलियाला 473 पर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडसाठी सोफी एक्कलस्टोनने पाच बळी आपल्या नावे केले.
ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या पहिल्या डावातील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडने देखील शानदार फलंदाजीचा नमुना सादर केला. कर्णधार हिदर नाईट व अनुभवी नॅट सिव्हर यांनी दमदार अर्धशतके साजरी केली. मात्र, सलामीवीर टॅमी ब्युमॉंटने इंग्लंडसाठी महिला कसोटी इतिहासातील सर्वोत्तम खेळी करताना 208 धावा केला. इंग्लंडचा संपूर्ण संघ 463 धावांवर सर्वबाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला 10 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियासाठी गार्डनरने चार तर मॅकग्राने तीन बळी मिळवले.
ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात कर्णधार मूनी व अनुभवी यष्टीरक्षक एलीसा हिली यांनी अनुक्रमे 85 व 50 धावा केल्या. इंग्लंडसाठी पुन्हा एकदा सोफी एक्कलस्टोनने 5 बळी टिपले. यासह इंग्लंडला अखेरच्या डावात विजयासाठी 268 धावांचे आव्हान मिळाले.
या आव्हानाचा पाठलाग करताना डॅनी व्यॅट वगळता इंग्लंडचे इतर फलंदाज ऍश्ले गार्डनरसमोर अक्षरशः निष्प्रभ ठरले. तिने 8 बळी मिळवत इंग्लंडचा डाव 178 धावांवर संपुष्टात आणला. यासह ऑस्ट्रेलियाने आठ वर्षानंतर महिला ऍशेस जिंकली.
(Ashleigh Gardner 8 Wickets Haul Help Australia For Women Ashes Win)
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीपूर्वी कांगारुच्या दोन धुरंधरांना पाँटिंगचा मोलाचा सल्ला, वाचा काय म्हणाला माजी कर्णधार
गावसकरांचे विधान वाढवेल ‘माही’च्या चाहत्यांचं टेन्शन! म्हणाले, धोनी नाही ‘हा’ आहे खरा Captain Cool





