७ एप्रिलपासून आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या सुरुवात होणार आहे. ५१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयने समालोचकांची निवड केली आहे.
यात वेगवान गोलंदाज अशोक दिंडाचाही समावेश आहे. दिंडा अायपीएलचे आजपर्यंत ७८ सामने खेळला असून त्यात त्याने ६८ विकेट्स घेतल्या आहेत. तो बंगालीत समालोचन करणार असून ६ समालोचकांच्या या टीममध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीचाही समावेश आहे.
याबरोबर सुब्रमण्यम बद्रीनाथ, अभिनव मुकुंद हे कन्नडमध्ये तर इरफान पठाण, मोहम्मद कैफ, मुरली कार्तिक, आरपी सिंग, अभिषेक नायर, रजत भाटिया आणि प्रग्यान ओझा हे एकेकाळी आयपीएल खेळलेले खेळाडू हिंदीत समालोचन करताना दिसतील.
बीसीसीआयने निवड केलेल्या समालोचकांच्या यादीत १०० जणांचा समावेश आहे. यात जागतिक स्थरावर जे स्पर्धेचे प्रसारण होणार आहे त्यासाठी समालोचन करणाऱ्या २४ जणांच्या यादीत ८ भारतीय तसेच १७ परदेशी समालोचकांचा समावेश आहे. तसेच यात अंजुम चोप्रा, लिसा स्थळेकर, इशा गुहा आणि मेलानी जॉन्स या चार महिला खेळाडूंचाही समालोचक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर यावर्षी लिटिल मास्टर सुनील गावस्करांचा मुलगा रोहन गावस्कर आयपीएल समालोचक म्हणून पदार्पण करणार आहे. त्यामुळे ही बाप-लेकाची जोडी समालोचन करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याआधीही त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकत्र समालोचन केले आहे.
विशेष म्हणजे चाहत्यांना यावर्षी आयपीएलमध्ये तामिळ, तेलगू, बंगाली आणि कन्नड या भाषांमध्येही समालोचन ऐकायला मिळणार आहे.
असे असतील आयपीएल २०१८ साठीचे समालोचक:
इंग्रजी समालोचन:
हर्षा भोगले, सायमन डौल, पामी बँगवा, संजय मांजरेकर, डी मॉरिसन, एम. स्लेट, मुरली कार्तिक, मायकेल वॉगन, इयान बिशप, डेव्हिड लॉईड, ब्रेट ली, ग्रॅमी स्मिथ, मॅथ्यू हेडन, सुनील गावस्कर, मेल जोन्स, केविन पीटरसन, मायकेल क्लार्क. , लिसा स्थळेकर, ईशा गुहा, नासिर हुसेन आणि रोहन गावस्कर
बंगाली समालोचन:
अशोक दिंडा, रानादेब रणजित बोस, अभिषेक झुनझुनवाला, सारादिन्दू मुखर्जी, जी. भट्टाचार्य, पी. रॉय, सौरव गांगुली
कन्नड समालोचन:
सुनील जोशी, विजय भारद्वाज, सुजीत सोमसुंदर, अखिल बालचंद्र, चंद्रमौली कानवी, जी. के. अनिल कुमार, गुंडप्पा विश्वनाथ आणि श्रीनिवास मूर्ती
तेलगू समालोचन:
व्यंकटपती राजू, वेणुगोपाल राव, कल्याण कृष्णा, सी. वेंकटेश, चंद्रशेखर आणि पी. सुधीर महावाडी
तामिळ समालोचन:
हेमांग बदानी, कृष्णम्माचारी श्रीकांत, लक्ष्मण शिवरामकृष्णन, व्हीबी चंद्रशेखर, सुब्रमण्यम बद्रीनाथ, अभिनव मुकुंद, के व्ही सत्यनारायण
हिंदी समालोचन:
आकाश चोप्रा, विवेक राजदान, निखिल चोप्रा, जतिन सप्रु, व्हीव्हीएस लक्ष्मण, सुनील गावस्कर, इरफान पठाण, कपिल देव, मोहम्मद कैफ, मुरली कार्तिक, आरपी सिंग, अभिषेक नायर, रजत भाटिया आणि प्रग्यान ओझा
जागतिक स्थरावर जे स्पर्धेचे प्रसारण होणार आहे त्यासाठी समालोचन:
भारत:सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, मुरली कार्तिक, हर्षा भोगले, एल. शिवरामकृष्णन, रोहन गावस्कर, दीप दास गुप्ता आणि अंजुम चोप्रा.
झिम्बाब्वे: एम बँगवा
दक्षिण आफ्रिका: ग्रॅमी स्मिथ
विंडीज: इयान बिशप
ऑस्ट्रेलियाः मायकेल स्लेटर, ब्रेट ली, मॅथ्यू हेडन, मायकेल क्लार्क, लिसा स्थलेकर, मेलानी जोन्स
इंग्लंड: मायकेल वॉगन, डेव्हिड लॉईड, केविन पीटरसन, नासिर हुसेन, ईशा गुहा
न्यूझीलंड: सायमन डौल, डॅनी मॉरिसन