दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ऍशवेल प्रिंस बांगलादेश क्रिकेट संघाचा पूर्णवेळ फलंदाजी प्रशिक्षक झाला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) गुरूवारी (१२ ऑगस्ट) याची घोषणा केली आहे. याआधी अशी माहिती आली होती की प्रिंस बांगलादेश संघाच्या प्रशिक्षक बनण्याच्या स्पर्धेत सर्वात आघाडीवर आहे. जाॅन लुईसनंतर संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाचे स्थान रिक्त होते. प्रिंसला संघाने झिम्बाबे दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदी नियुक्त केले होते. आता प्रिंस बांगलादेश संघाचा पूर्णवेळ प्रशिक्षक झाला आहे.
प्रिंस नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. बांगलादेश संघाने या मालिकेतील त्यांच्या प्रदर्शनाने सर्वांनाच प्रभावित केले होते. त्यांनी ४-१ च्या फरकाने बलाढ्या ऑस्ट्रेलियाला या टी२० मालिकेत मात दिली होती. मात्र प्रिंस न्युझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी उपलब्ध असेल. बांगलादेश संघ १ सप्टेंबरपासून ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी न्यूझीलंडशी भिडणार आहे.
प्रिंसने बांगलादेशच्या पुरुष संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारण्यासाठी दक्षिण अफ्रिकेतील एका पश्चिम प्रांताच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
दक्षिण अफ्रिकेचा माजी प्रशिक्षक रसेल डोमिंगो वर्तमानात बांगलादेशचा मुख्य प्रशिक्षक आहे. रयान कुक क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे आणि आता ऍशवेल प्रिंस बांगलादेशचा फलंदाजी प्रशिक्षक झाला आहे. अशाप्रकारे बांगलादेश क्रिकेट संघाला लाभलेले तीनही प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकी आहेत.
44 वर्षीय प्रिंस लेवल 3 चा प्रशिक्षक आहे. त्याने केप कोबराला प्रशिक्षण दिले आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी फलंदाजी मार्गदर्शकासोबतच संघासाठी मुख्य प्रशिक्षकाचे कामही केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटर ते प्रशिक्षक बनलेल्या शॉनने निवडला सर्वकालिन वनडे संघ, ‘या’ भारतीयांना दिली जागा
‘धोनी फॅमिली’ची युएईत लँडिग, विमानतळावरील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
‘या’ठिकाणी चुकतो विराट, दिग्गज भारतीयाने कोहलीच्या फलंदाजीचे केले विश्लेषण