जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा शुक्रवारपासून (१८ जून) भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना साउथॅम्प्टनमधील एजस बाऊल मैदानावर होणार आहे. कोण बनेल पहिलावहिला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय संघ पूर्ण तयारीनिशी या सामन्यात उतरणार आहे.
भारतीय संघाने अंतिम 11 खेळाडूंची यादी गुरुवारी (१७ जून) जाहीर केली. भारतीय संघात सर्व अनुभवी खेळाडू आहेत. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि ईशांत शर्मा यांच्यातून अनुभवी ईशांत शर्माची निवड करण्यात आली आहे. एजस बाऊल मैदानावर भारतीय संघ 2 फिरकीपटूंसोबत उतरणार आहे. ते दोघेही संघासाठी चांगली फलंदाजीही करू शकतात. यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड केली गेली आहे. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
अश्विन- जडेजाची जोडी आहे धोकादायक
कसोटी क्रिकेटमध्ये रवीचंद्रन अश्विनने 409 विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याचा संघसहकारी रवींद्र जडेजाने 220 विकेट्स घेतल्या आहेत. या दोघांनी सोबत 35 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 362 विकेट्स घेतल्या आहेत. माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे- हरभजन सिंगच्या जोडीनंतर या दोघांची सर्वात यशस्वी जोडी आहे. अनिल कुंबळे- हरभजन सिंगच्या जोडीने 54 कसोटी सामन्यात 501 विकेट्स घेतल्या आहेत.
या सामान्याआधी अश्विन आणि जडेजा हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मेलबर्न आणि सिडनी कसोटी सामना एकत्र खेळले होते. मेलबर्नमध्ये या जोडीने 8 विकेट्स घेतल्या होत्या, तर सिडनी कसोटीत 6 विकेट्स घेतल्या होत्या. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात दुखापत झाल्यामुळे रवींद्र जडेजाला गोलंदाजी करता आली नव्हती. भारतीय संघ मेलबर्न कसोटी सामना जिंकला होता आणि सिडनी कसोटी सामना बरोबरीत सोडवण्यात यश आले होते.
इंग्लंडमध्ये अश्विन- जडेजाची प्रदर्शन
जडेजाने इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहे, तर अश्विनने ६ कसोटी सामन्यात फक्त १४ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्ध खेळताना अश्विनने ६ कसोटी सामन्यात ४८ विकेट्स घेतल्या आहे, तर जडेजाने ६ कसोटी सामन्यात फक्त १९ विकेट्स घेतल्या आहेत.
न्यूझीलंड संघात सुरुवातीच्या ५ फलंदाजांमध्ये ३ डावखुरे फलंदाज आहेत, त्यांच्यावर अश्विन प्रभावी दिसू शकतो. डावखुऱ्या फलंदाजांसमोर अश्विनचे प्रदर्शन चांगले आहे. अश्विन आणि जडेजा हे दोघेही अंतिम सामन्यात भारतीय संघाचा महत्वपूर्ण भाग आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप फत्ते करण्यासाठी कर्णधार कोहलीने बनवला ‘हा’ मास्टरप्लॅन, वाचा
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ‘हे’ भारतीय शिलेदार बलाढ्य न्यूझीलंडचा उडवतील धुव्वा!
दुर्दैवच म्हणावे! WTC फायनलमध्ये ‘हा’ अंपायर भारतासाठी अनलकी, यापुर्वी ४ विश्वचषकात नडलाय