बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात झालेला दुसरा कसोटी सामना अटतटीचा झाला. यामध्ये भारत जिंकला आणि दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. यानंतर भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने त्याचे विचार व्यक्त केले आहे. त्याने त्याच्या यूट्युब चॅनलवर बोलताना दुसऱ्या सामन्यातील बांगलादेशच्या एका खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्याने त्या खेळाडूची तुलना विराट कोहली, केन विलियम्सन, जो रुट आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याशी केली.
भारताचा अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या नावावर कसोटीमध्ये 5 शतके आहेत. त्याने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात महत्वपूर्ण आणि सामनाविजयी नाबाद 42 धावांची खेळी केली. या सामन्यानंतर अश्विनने त्याचे विचार यूट्युब चॅनलवर व्यक्त केले आहे. त्यामध्ये त्याने लिटन दास (Litton Das) आणि मेहदी हसन मिराज यांच्याशी झालेले संभाषण सांगितले आहे.
अश्विन म्हणाला, “लिटन दास आणि मेहदी हसन स्विमिंगपुलमध्ये होते. तेव्हा त्यांच्यात काहीतरी बोलणे सुरू होते. मला वाटले ते दोघे बंगाली भाषेत मला चिढवत असतील, मात्र ते दोघे स्वभावाने खरच खूप छान आहेत. ते म्हणाले, ‘स्वागत आहे ऍश भाई. आम्हाला वाटले तू नाईट वॉचमन असेल, पण तू का नाही आला? ते जाऊ दे तू उद्या फलंदाजीला येणारच आणि तूझी विकेट काढणे अवघड असेल.’ ते मला चिढवत राहिले. मी हसनला म्हणालो, ’35 षटकांपर्यंत वाट पाहा, काहीही होऊ शकते.'”
अश्विनने लिटनच्या फलंदाजीचे कौतुक करत म्हटले, “मी लिटन दासला सांगितले की मी तुझे कसोटी पदार्पण पाहिले आहे. त्याच्या फलंदाजीचे कौशल्य पाहून मला वाटले हा बांगलादेश क्रिकेटला पुढे नेईल. मी त्याला सांगितले, ‘माझी एक छोटीशी निराशा झाली आहे. मला वाटले की तू विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रूट आणि केन विल्यमसन यांच्या स्तरावर पोहोचशील.’ त्याने उत्तर दिले, ‘होय, मी तुमच्याशी सहमत आहे. आमची क्रिकेट संस्कृती वेगळी आहे. आम्ही फक्त इथेच खेळतो यामुळे आम्हाला अधिक चांगले प्रदर्शन करता येत नाही. जेव्हा वेगळ्या खेळपट्टीवर (बाहेरील देश) खेळतो तेव्हा आम्हाला जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो.”
हा सामना भारताने 3 विकेट्ने जिंकला. त्यामध्ये भारताच्या दुसऱ्या डावात अश्विन- श्रेयस अय्यर यांनी आठव्या विकेटसाठी केलेली नाबाद 71 धावांची भागीदारी उल्लेखनीय ठरली. तर बांगलादेशच्या दुसऱ्या डावात लिटनने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 73 धावा केल्या होत्या. Ashwin disappointed with Bangladesh Litton Das! Said, ‘I thought you would be like Kohli-Williamson but…’
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्याला न सांगताच बीसीसीआयने खांद्यावर दिली मोठी जबाबदारी! म्हणाला, ‘पप्पांनी मला मोबाईलवरून…’
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने भारताला फायदा, सलग दुसऱ्यांदा खेळणार कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये!