भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन उद्या श्रीलंकेविरुद्ध जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरेल तेव्हा त्याच्या नावावर एक खास विक्रम होईल. भारताकडून ५० कसोटी सामने खेळणारा अश्विन ३०वा खेळाडू बनेल.
आजपर्यंत अश्विनने भारताकडून ४९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने फलंदाजीमध्ये ४ शतकांच्या सहाय्याने ३२.२५च्या सरासरीने १९०३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये अश्विनने २५.२२ च्या सरासरीने २७५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्याने तब्बल २५वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात समावेश असणाऱ्या केवळ इशांत शर्मा (७७) आणि विराट कोहली (५७) यांनी ५० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत तर पुजाराने ४८ कसोटी सामन्यांत भारताकडून भाग घेतला आहे.
आर अश्विनने २०११ साली नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले आहे.