भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्याप्रमाणेच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघांमध्येही बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. मंगळवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना सुरू झाला. उभय संघांतील हा सामना निर्णायक असल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण तयारीने मैदानात उतरला. सामना सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधील एक फोटो तुफान व्हायरल झाला.
मंगळवारी (26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा दुसरा कोसटी सामना सुरू झाला. पण पावसाने व्यत्यय आणल्यामुळे पहिल्या दिवशी 66 षटकांचा खेळ झाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट्सच्या नुकसाना 187 धावांपर्यंत मजल मारली. दिवसाखेर मार्नस लॅबुशेन (44*) आणि ट्रेविस हेड (9*) नाबाद आहेत. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि शुस्मान ख्वाजा यांनी अनुक्रमे 38 आणि 42 धावांवर विकेट्स गमावल्या. स्टीव स्मिथ यानेही 26 धावा करून विकेट गमावली. ऑस्ट्रेलियासमोर या सामन्यात पाकिस्तानचे आव्हान आहे. पण हा सामना सुरू होण्याआधी ड्रेसिंग रुममध्ये मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये भारताच्या रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची चर्चा झाली, असेच दिसते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधील आहे. यामध्ये एका व्हाईट बोर्डवर क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिरकी अष्टपैलू खेळाडूंची यादी लिहिली आहे. या यादीत अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल यांचीही नावे आहेत. फोटोत ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ देखील दिसत आहे. या बोर्डवर तीन भारतीयांव्यतिरिक्त डॅनियल विटोरी, गॅरी सोबर्स, शाकिब अल हसन, ट्रेविस हेड, समित पटेल यांचीही नावे पाहायला मिळत आहेत. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या फोटोखाली पाहायला मिळत आहेत.
Best spinning all rounders list in the Australian dressing room.
– Jadeja, Ashwin and Axar in the list…!!!! pic.twitter.com/76TDz2r50e
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2023
(Ashwin-Jadeja discussion in Australia’s dressing room before the clash with Pakistan, photo with Smith goes viral)
बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा, आमेर जमाल, साजिद खान.
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA: मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका कसोटीत न खेळण्याने दिग्गज क्रिकेटपटू नाराज; म्हणाला, ‘ही अत्यंत लाजिरवाणी…’
पहिल्या कसोटीत जडेजा का खेळत नाहीये? BCCI आणि रोहित, दोघांनी सांगितलं मोठं कारण; घ्या जाणून