सोमवारी (५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२० चा १९ वा सामना झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत बेंगलोर संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि दिल्ली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्स गमावत १९६ धावा केल्या होत्या.
दिल्लीने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाकडून सलामीला देवदत्त पडिक्कल आणि ऍरॉन फिंच उतरले होते. यादरम्यान एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. सामन्यातील तिसरे षटक दिल्लीचा फिरकीपटू आर अश्विन टाकत होता. या षटकातील चौथा चेंडू पडिक्कलला टाकण्यासाठी अश्विनने धाव घेतली. परंतु त्याचवेळी नॉन स्ट्राईकर एन्डला उभा असलेला फिंचने अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडली. यावेळी अश्विनने त्याला मंकडींग केले नाही. त्याने फिंचला जीवदान दिले. परंतू त्यावेळी अश्विनने एकप्रकारे फिंचला समज दिली होती.
यावेळी अश्विनची खिलाडूवृत्ती पाहायला मिळाली. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/yeswanth86/status/1313154391461883911
Vintage Ashwin back 😂 pic.twitter.com/RGZNquXKI7
— Jay 🌊 (@ntr_jay) October 5, 2020
https://twitter.com/Cric_life59/status/1313154339246993417
Ashwin got chance to out finch but he doesn’t 🙏
What he did in past to buttler in ipl ❤️
Gentlemen’s Game Cricket @ashwinravi99 @DelhiCapitals pic.twitter.com/cvSynPLaWB— Vasu chowdari (@BeliveYOLO) October 5, 2020
Ashwin Anna 😂 pic.twitter.com/mLH3FqNASr
— R A T N I S H (@LoyalSachinFan) October 5, 2020
Ok, so? Dont hold that against Ashwin, he made the correct decision – well played to him 👏👏 proper cricket
— Dave Blathis (@stuartb16) October 5, 2020
काय आहे नक्की वाद?
अश्विनचा दिल्ली कॅपिटल्ससाठी हा पहिला हंगाम आहे. यापूर्वी तो किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर होता आणि गेल्या आयपीएल हंगामात त्याने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केले होते. बटलरला अशा प्रकारे बाद केल्याबद्दल त्याच्यावर टीका झाली होती. मंकडिंग बद्दलची चर्चा यावर्षी आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देखील सुरू झाली होती. त्यावेळी रिकी पाँटिंगने म्हटले होते की, त्याने अश्विनला मंकडिंग पध्दतीने खेळाडूंना बाद करू नका असे सांगितले आहे.
रिकी पाँटिंगला इनसाइडर स्पोर्ट्सच्या शो ‘अम्स्ट्रेड फेस 2 फेस क्रिकेट सीरिज’मध्ये विचारले गेले होते की तो अश्विनला स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या अंतिम षटकात मंकडिंग पध्दतीने एखाद्याला बाद करण्याची परवानगी देईल काय? यावर रिकी पाँटिंगने हसत हसत सांगितले होते की, ‘मी अश्विनला शेवटचे षटक टाकू देणार नाही.’
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पुढे असे देखील म्हणाला, “आम्ही याबद्दल बोललो आहे. मी अश्विनला माझी इच्छा सांगितली आहे. मी त्याला सांगितले आहे की, अश्विनने मंकडिंग करावे असे मला वाटत नाही. हा नियम योग्य वाटत नाही. पंचाने हे सुनिश्चित केले पाहिजे की नॉन-स्ट्रायकर फलंदाज गोलंदाजीपूर्वी क्रीज सोडत नाही.”
तथापि, मंकडिंग हा खेळाचा एक साधा नियम आहे. तो पुढे म्हणाला होता की, ” मी या नियमामुळे खूश नाही. तथापि, मी एमसीसीशी समितीशी बांधिल आहे. पंचांनी या बाबतीत अधिक सावध असले पाहिजे आणि फलंदाज फसवणूक करत नाहीत हे पहावे.”