---Advertisement---

विराटला तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या रबाडाचं होतंय जोरदार कौतुक, पाहा काही खास ट्विट्स

On: मंगळवार, ऑक्टोबर 6, 2020 8:24 AM
---Advertisement---

आयपीएलच्या या हंगामातील 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बेंगलोर संघांचे महत्त्वपूर्ण फलंदाज डावाच्या सुरुवातीच्या काही षटकातच तंबूत परतले, त्यामुळे आरसीबी केवळ 137 धावाच करू शकला आणि दिल्लीने सामना 59 धावांनी जिंकला.

दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 4 षटकांत 24 धावा देत 4 गडी बाद केले आणि सामना जिंकण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याने विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि इसरु उडानाला बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे ट्विटरवर त्याचे चांगलेच कौतुक होत आहे.

https://twitter.com/niharika_raina/status/1313164213108445184?s=20

दिल्लीचा पुढील सामना आता 9 ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---