भारताचा स्टार फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीच्या शैलीची स्तुती सर्व स्तरातून होत आली आहे. अशातच महान ऑफ स्पिनर मुथैया मुरलीधरनने रविचंद्रन अश्विनला सध्याच्या युगातील सर्वोत्तम ऑफ स्पिनर्स असल्याचे म्हटले आहे. पण त्याला भीती वाटते की अश्विन आपला फॉर्म गमावू शकतो.
मुरलीधरनच्या मते, अश्विनवर भारताच्या उर्वरित फिरकी गोलंदाजांकडून नियमित कामगिरीसाठी दबाव टाकला जात आहे, जर तो दबावाखाली आला तर त्याचा त्याच्या फॉर्मवर परिणाम होईल.
मुरलीधरन पुढे म्हणाला की, त्याने केवळ कसोटीच नव्हे तर खेळाच्या तीनही प्रकारात खेळले पाहिजे. मुरलीधरनने असा विश्वास व्यक्त केला की अश्विन एक अतिशय हुशार गोलंदाज आहे, पण सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये त्याला विकेट्स न मिळाल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. अश्विनने अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वात जलद 400 विकेट घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज आहे.
पण भारतीय संघाचा हा स्टार गोलंदाज बऱ्याच काळापासून फक्त कसोटी क्रिकेटमध्ये खेळत आहे. तो बराच काळ एकदिवसीय आणि टी -20 संघाचा भाग नव्हता, तर रवींद्र जडेजा हा तिन्ही प्रकारात खेळत आहेत. तसेच मर्यादीत षटकांच्या क्रिकेट प्रकारात युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चाहर यांसारखे फिरकीपटू भारतीय संघाकडून नियमित खेळताना दिसत आहेत.
मुथय्या मुरलीधर पुढे म्हणाला, ‘त्याला आपला आत्मविश्वास राखणे आणि खेळाच्या सर्व प्रकारात खेळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर तो फक्त कसोटी क्रिकेट खेळला तर त्याचा फॉर्म खाली येऊ शकतो. कारण तो नियमित सामने खेळू शकणार नाही. जर तो तीनही प्रकारामध्ये खेळला, तर तो नेहमीच शिकत राहील.’
मुरलीधरन अश्विनचे कौतुक करत म्हणाला की, ‘तो चांगल्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करतो. तो त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून फलंदाज नेहमी विचार करायला भाग पडला पाहिजे. बरं, परदेशातील खेळपट्टीवर अश्विनला फार मदत मिळत नाही, पण भारतात तो चेंडू फिरल्यानंतर अत्यंत धोकादायक असतो.’
अश्विनने अखेरचा एकदिवसीय सामना जून २०१७ मध्ये, तर अखेरचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना जुलै २०१७ मध्ये खेळला आहे. त्यानंतर गेल्या ४ वर्षांपासून त्याला मर्यादीत षटकांचे सामने भारताकडून खेळता आलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
“पहिल्या कसोटीत भारताला त्या खेळाडूची भासेल कमतरता”, दिग्गज भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया
अभिनंदन! इंग्लंडचा सर्वात यशस्वी फलंदाज बनला रूट, केली ‘ही’ अद्वितीय कामगिरी