मुंबई । बरेली की बर्फी चित्रपटाच्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी ह्या कबड्डीवर आधारित चित्रपट बनवणार आहे. त्या सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. या चित्रपटाचे निर्माते म्हणून फॉक्स स्टार स्टुडिओ कंपनी पुढे आली आहे.
याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ” मला ज्या विषयांची आवड आहे त्यातील कबड्डीवर मला काम करायला मिळणार आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. मला यात फॉक्स स्टार स्टुडिओ कंपनी मदत करणार आहे याचा खूप आनंद आहे. “
कबड्डी हा सध्या देशात चर्चा होत असलेला सर्वात मोठा खेळ आहे. अनेक गोष्टीत या खेळाने बाकी खेळांना मागे टाकले आहे. प्रो कबड्डीने या खेळाला मुख्य प्रवाहात आणले. तसेच याला मोठी प्रसिद्धीही आणि प्रेक्षक टीव्हीच्या माध्यमातून लाभले.
भारतीय संघाचे जगात या खेळामध्ये वर्चस्व आहे. कबड्डीपटू यातून सुपरस्टार झाले आहेत. आता या खेळावर चित्रपट बनत असल्यामुळे ही एक कबड्डीप्रेमींसाठी खास गोष्ट आहे.
दंगल चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शिकाअश्विन पत्नी आहेत. त्यामुळे खेळावर एक उत्तम सिनेमा बनवायचा मोठा अनुभव या कुटुंबाला आहे. त्यामुळे कबड्डीवर एक उत्तम सिनेमा कबड्डीप्रेमींना पाहायला मिळेल यात शंका नाही.
सध्या भारतीय संघ एशियन चॅम्पिअनशिपसाठी सोनिपत, हरियाणा येथे जोरदार तयारी करत असून ३५ पैकी १२ खेळाडूंचा संघ १९ नोव्हेंबर रोजी इराणची राजधानी तेहरानला स्पर्धेसाठी रवाना होईल.
कधी नाही ते माध्यमांत या स्पर्धेची मोठी चर्चा आहे. अशा अनेक कारणांमुळे या खेळाला नक्कीच चांगले दिवस आले आहेत असे मानले जात आहे.
स्पोर्ट्स लाईव्ह अपडेट्स आमच्या फेसबुक पेजवर: Maha Sports महा स्पोर्ट्स