भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून आशिया चषक स्पर्धेत सुरुवात गोड केली आहे. हा हाय वोल्टेट सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळला गेला. शेवटच्या षटकांमध्ये भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या वादळी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. पराभवानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याला रडू कोसळले.
नसीम शाह (Naseem Shah) याने भारताविरुद्ध पाकिस्तानसाठी पदार्पण केले आणि चमकदार कामगिरी देखील केली. भारत आणि पाकिस्तान हे संघ जेव्हा कधी एकमेकांविरुद्ध खेळतात, तेव्हा खेळाडू विजयासाठी पूर्ण प्रयत्न करतात. नसीम शाहने देखील पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी तारेवरची कसरत केली, पण विजय मिळवू शकला नाही. त्याने पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) याला क्लीन बोल्ड केले. याच षटकात जर स्लिप्समध्ये विराट कोहली (Virat Kohli) याचा झेल सुटला नसता, तर तो नसीमची दुसरी शिकार ठरला असता.
नसीमने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी केली आणि 27 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या. गोलंदाजी करताना त्याचे स्नायू तानले गेल्याचे दिसले. डावातील 18 व्या षटकात त्याला तीव्र वेदना झाल्या, ज्यानंतर फिजिओंना मैदानात यावे लागले. सामना संपल्यानंतर नसीम मैदानातून बाहेर जात असताना रडत असल्याचे दिसले होते. पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट त्याची समजूत घालताना दिसला होता. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Nasim Shah you are our hero you bowled fantastic we are proud of you don't be disappointed#AsiaCup2022#INDvPAK#PakVsInd#PCBJawabDo pic.twitter.com/JHX3xt7LlC
— M Yahya farooqi Brohi (@myahyafarooqi) August 29, 2022
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकात 147 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य 19.4 षटकात आणि पाच विकेट्सच्या नुकसानावर गाठले. भारताला आता आशिया चषकातील दुसरा सामना 3 ऑगस्ट रोजी हॉन्गकॉन्ग सोबत खेळायचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी, शाहीन आफ्रिदी लवकरच करणार संघपुनरागमन!
रोहित अन् विराटने एकत्र घेतली श्रीलंकन चाहत्याची भेट! कारण ऐकून तुम्हालाही हेवा वाटेल
लंकादहनानंतर आता बांग्लादेशला नमवायला अफगाणिस्तान सज्ज! पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11