आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामात भारताच्या विराट कोहली याने जबरदस्त शतक केले. गुरूवारी (8 सप्टेंबर) सुपर फोरच्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध ही कामगिरी केली आहे. टी20 प्रकारचा हा सामना दुबई येथे खेळला गेला. त्याच्या या नाबाद शतकी खेळीने क्रिकेटविश्व आनंदून गेले आहे. भारतीय चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. तर सामन्यानंतर त्याच्याही चेहऱ्यावरील निराशेची भावना मिटली गेली असून त्याने महत्वाचे विधानही केले आहे.
भारताचा विराट कोहली (Virat Kohli) हा अनुभवी आणि स्फोटक फलंदाज. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. 2008मध्ये भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण करणाऱ्या विराटने सामन्यानंतर म्हटले त्याच्यात आणखी क्रिकेट बाकी आहे.
विराटने या सामन्यात 200च्या स्ट्राईक रेटने 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. हे करताच त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या विक्रमाला मागे टाकले आहे. रोहितने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 117 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम विराटच्या नावावर आहे. शतकी खेळी केल्याने भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या (Hardik Pandya), युझवेंद्र चहल इत्यादींनी त्याचे अभिनंदन केले आहे.
तब्बल 1019 दिवसांनंतर विराटने आंतरराष्ट्रीय शतक केले आहे. यामुळे खेळाडूंनी विराटची गळाभेट घेत त्याचे अभिनंदन केले. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यानेही त्याचे अभिनंदन केले तेव्हा विराट म्हणाला, “आताही आहे क्रिकेट बाकी.”
Virat Kohli to Bhuvneshwar Kumar after yesterday's century – "Abhi baki hai cricket (Cricket is still left in me)" – Virat Kohli is True Champion, True Fighter.https://t.co/tyKu4qGmMK
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 9, 2022
विराटने केलेल्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराटने चौफेर फलंदाजी केली. त्याने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याच्या या शतकाने चाहत्यांच्या आणि त्याच्याही चेहऱ्यावर हसू आले आहे. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील पहिले शतक ठरले आहे. तसेच त्याची ही टी20 प्रकारातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सब कंट्रोल में है?’, पहिल्यांदाच गोलंदाजी करणाऱ्या कार्तिकची पंतने घेतली मजा
विराटने शतक करताच गौतम गंभीरचा यू-टर्न! म्हणाला, ‘तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमारने…’
कोहलीच्या सलामीच्या स्थानावरून भडकला राहुल; म्हणतोय, ‘तर मी काय संघाबाहेर जाऊ?’