---Advertisement---

पाकिस्तान वि. श्रीलंका संघात रंगणार आशिया चषकाची फायनल, कसे आहेत ‘हेड टू हेड रेकॉर्ड’?

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 1:03 PM
SriLanka-Pakistan
---Advertisement---

आशिया चषक 2022 चा हंगाम शेवटाकडे चालला आहे. शुक्रवारी (09 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या संघात शेवटचा सुपर-4 सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवत 5 विकेट्सने विजय मिळवला. यानंतर आता पुन्हा एकदा अंतिम सामन्यात हे संघ आमने सामने येणार आहेत. रविवारी (11 सप्टेंबर) दुबईत आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी उभय संघांतील आकडेवारींवर नजर टाकू…

श्रीलंका आणि पाकिस्तान संघांनी आतापर्यंत दुबईत 3 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी श्रीलंका संघाने 2 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला आतापर्यंत फक्त 1 सामना जिंकता आला आहे. आशिया चषकाचा अंतिम सामनाही याच मैदानावर होणार असल्याने दसुन शनाकाच्या नेतृत्त्वाखालील संघाचे पारडे जड दिसत आहे.

श्रीलंका संघाने 13 डिसेंबर 2013 ला दुबईच्या मैदानावर झालेल्या टी20 सामन्यात पाकिस्तानला 24 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर आता आशिया चषक 2022 मधील शेवटच्या सुपर-4 सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभवाची धूळ चारली आहे. तर पाकिस्तान संघाने 11 डिसेंबर 2013 मध्ये श्रीलंकेला 3 विकेट्सने हरवले होते.

मागील 4 टी20 सामन्यांबाबत बोलायचे झाल्यास, श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. श्रीलंकेने मागील 4 टी20 सामन्यांपैकी 3 सामन्यात पाकिस्तानला त्यांच्याच घरात पराभूत केले आहे.

एकूण आमने सामने कामगिरी पाहायची झाल्यास, श्रीलंका आणि पाकिस्तान संघांनी 2007 पासून ते आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 22 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाकिस्तानने 13 तर श्रीलंकेने 9 सामने जिंकले आहेत. अशात आता अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारतो?, हे पाहावे लागेल.

आशिया चषक 2022साठी पाकिस्तानचा संघ-
मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हसन अली, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान कादिर, हैदर अली, शाहनवाज दहनी, शादाब खान, नसीम शाह

श्रीलंका संघ: दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुणतिलका, पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ असलांका, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजय डिसिल्वा, वानिंदु हसरंगा, महीष तीक्षणा, जैफ्री वांडेरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, मतीशा पथिराना, नुवानिदु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---