आशिया चषक (Asia Cup) 2022च्या हंगामात गुरूवारी (8 सप्टेंबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सुपर फोरचा सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 मिनिटांनी खेळला जाणार आहे. तर त्याआधीच मोठी बातमी पुढे आली आहे. ज्यामुळे नाणेफेकीला उशिर होणार आहे. स्टेडियमच्या बाहेर आग लागल्याने सामन्याला उशिर होण्याची शक्यता आहे. सध्यातरी या आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले गेले आहे. मात्र स्टेडियमबाहेर काळे धूर दिसत आहेत.
भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अशात या स्पर्धेतील दोन्ही संघाचा हा शेवटचा सामना आहे. यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकत शेवट चांगला करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान आतापर्यंत तीन वेळा समोरासमोर आले आहेत. त्यातील तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. तर सध्या भारत खराब फॉर्ममध्ये आहे. त्यांनी या स्पर्धेत मागील दोन्ही सामने गमावले आहेत.
आशिया चषकात सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध सामने गमावल्याने भारत कुठे कमी पडला हे समोर येत आहे. तसेच संघात अनेक बदल केले गेल्याने असे निकाल लागले अशाही चर्चांना वाचा फुटली आहे.
या सामन्यात भारताला अफगाणिस्तान चांगली टक्कर देऊ शकतो. कारण अफगाणिस्तानकडे राशीद खान, फझल हक फारुकी आणि मुजीब उर रहमान असे एकाहून एक चांगले गोलंदाज आहेत. तर फलंदाजीत रहमानउल्ला गुरबाज आणि हजरतुल्ला झझाई हे टी20 स्पेशालिस्ट आहेत.
भारताची संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
अफगाणिस्तानचा संभाव्य प्लेइंग 11: हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, मोहम्मद नबी (कर्णधार), रशीद खान, अजमतुल्ला ओमरझाई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान आणि फजल फारुकी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकी विश्वचषक 2023: आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने जाहीर केले ड्रॉ, ड गटात भारतासोबत इंग्लंड
मानलं भज्जी पा! विदेशात ओलीस ठेवलेल्या भारतीय मुलीची सुटका; कौतुकाचा होतोय वर्षाव
अवघ्या 195 धावांचा बचाव करत ऑस्ट्रेलियाचा 113 धावांनी दणदणीत विजय; मालिकाही केली नावावर