आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघ रविवारी (२८ ऑगस्ट) त्याच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. भारताला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्याविषयी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सोशल मीडियावर दोन्ही संघांचे चाहते एकमेकांविरुद्ध जोरदार मिम्स शेअर करत आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यासाठी नेटकरी वेगवेगळे आणि मजेदार मिम्स बनवत आहेत, जे चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये मिम्स शेअर करण्याची चढाओढ लागल्याचे दिसत आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याविषयी सोशल मीडियावरील व्हायरल मिम्स –
Match jaruri hai 🥳#INDvPAK pic.twitter.com/GSqNGvqqn2
— Shanya🇮🇳 (@Heinn_ji) August 28, 2022
Cricket fans right now..#AsiaCup2022 #INDvPAK pic.twitter.com/XcLJQNowQU
— RVCJ Media (@RVCJ_FB) August 28, 2022
Replacement of Shaheen Afridi, Hassan Ali and mir Hamza in one PKG😁😁😁#PakVsInd#AsiaCup2022 pic.twitter.com/5PjJpbRo9f
— Shah Nawaz Baloch (@shahnawazj850) August 22, 2022
Babar Azam making sure Hassan Ali will play at any cost..!!#PakVsInd Hasnain #AsiaCup2022 pic.twitter.com/LW22PZPzFb
— Haseeb Khan 🇵🇰 (@HaseebkhanHk7) August 27, 2022
वसीम जाफरने शेअर केला खास व्हिडिओ –
भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर वसीम जाफर (Wasim Jaffer) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. भारत-पाक सामन्याविषयी त्याने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत त्याने एकप्रकारे भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांची सोशल मीडियावरील परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जाफरच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
India and Pakistan fans on social media today 😄 #INDvsPAK #AsiaCup pic.twitter.com/8O6P24MrCT
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 28, 2022
दरम्यान, मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघ शेवटच्या वेळी आमने सामने आले होते. भारतीय संघ पाकिस्तानकडून यापूर्वी कधीच विश्वचषक स्पर्धेत पराभूत झाला नव्हता. पण मागच्या वर्षी पाकिस्तानने हा पायंडा मोडली आणि भारताला टी-२० विश्वचषकातील सामन्यात १० विकेट्सने पराभूत केले. भारतीय संघ रविवारी जेव्हा पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल, तेव्हा मागच्या वर्षीच्या पराभवाची कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात असेल.
आशिया चषकासाठी निवडलेला भारत आणि पाकिस्तान संघ –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान.
पाकिस्तान: बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘सध्याच्या काळात आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे!’ विराट कोहलीने बाबरवर केला कौतुकांचा वर्षाव
VIDEO: रसेलने ठोकले 6 चेंडूत 6 सिक्स; केली युवी अन् पोलार्डच्या विक्रमाची बरोबरी
खळबळजनक! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या पतीचा मृतदेह आढळला