---Advertisement---

Asia Cup 2022: एकतर्फी सामन्यात टीम इंडियाचा थायलंडवर मोठा विजय, 6 ओव्हर्समध्ये नावावर केला सामना

On: सोमवार, ऑक्टोबर 10, 2022 3:00 PM
Team India
---Advertisement---

बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकात सोमवारी (10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध थायलंड सामना खेळला गेला. सिल्हेटमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारत स्म्रीती मंधाना हीच्या नेतृत्वाखाली खेळला. तिने घेतलेला निर्णय उत्तमच ठरला कारण थायलंड संघ 15.1 षटकातच 37 धावासंख्येवरच सर्वबाद झाला, तर भारताने हा सामना 9 विकेट्सनेच जिंकला आहे.

या सामन्यात भारताकडून शफाली वर्मा आणि एस मेघना यांनी फलंदाजीची सुरूवात केली. मागील सामन्याची स्टार शफाली यंदा 8 धावा करताच बाद झाली. तिला नटाया बुचाथमने झेलबाद केले.  त्यानंतर मेघना आणि पूजा वस्त्राकर यांनी संघाला विजय मिळवून दिला. मेघनाने 18 चेंडूत 3 चौकारांच्या साहाय्याने नाबाद 20 धावा केल्या. त्याचबरोबर वस्त्राकरने 12 चेंडूत 2 चौकार मारत नाबाद 12 धावा केल्या.

यावेळी भारत रेणूका सिंग, हरमनप्रीत कौर, राधा यादव आणि दयालन हेमलता यांच्याशिवाय खेळला. थायलंडला रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावली. भारताची फिरकीपटू स्नेह राणा हीने तिच्या फिरकीने थायलंडला त्रस्त केले. तिला दीप्ति शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांची योग्य साथ लाभली. राणाने 4 षटके टाकताना 9 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

भारताकडून मेघना सिंग हीने 2.1 षटके टाकताना 6 धावा देत एक विकेट घेतली. तसेच दीप्तिने 4 षटकात 10 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. पूजा वस्त्राकर हीने 2 षटके टाकली. तिने त्यामध्ये 4 धावा दिल्या. राजेश्वरीने 3 षटकात 8 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

तसेच भारत आधीच या स्पर्धेच्या उंपात्य फेरीत पोहोचला असून त्यांच्यासाठी हा केवळ औपचारिक होता, तर थायलंडकडे उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी होती. तसेच थायलंड अजूनही उपांत्य फेरीत जाऊ शकतो जर मंगळवारी (11 ऑक्टोबर) खेळल्या जाणाऱ्या युनायटेड अरब अमिराती विरुद्ध बांगलादेश सामन्यात युएई जिंकला तरच ते उपांत्य फेरीत जातील.

स्पर्धेतील या 19व्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवल्याने गुणतालिकेत पहिले स्थान कायम राखले आहे. भारताने या स्पर्धेत एकूण  6 सामने खेळले असून 5 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानविरुद्ध भारत पराभूत झाला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हिला डाला ना! मैदान तर गाजवलंच, आता ‘माही भाईं’चा डोळा फिल्म इंडस्ट्रीवर; सुरू केलं प्रोडक्शन हाऊस
मूर्ती लहान, कीर्ती महान! इशानने 24 वर्षांच्या वयात केला ‘हा’ पराक्रम, ‘माही भाई’ टेबल टॉपर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---