आशिया चषक 2022मधील 13वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शुक्रवारी (6 ऑक्टोबर) बांगलादेशच्या सिलहेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाला. या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार बिस्माह महारूफ हीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानने निदा दार हिच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 6 विकेट्स गमावत 137 धावा धावफलकावर लावल्या.
पहिल्या पॉवरप्लेमध्ये भारताचाच बोलबाला राहिला. दीप्ति शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी एकामागोमाग पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. दोघींनी सलामीवीर मुनीबा अली (17) आणि सिदरा अमीन (11) यांच्या विकेट्स घेत पाकिस्तानची अवस्था खिळखिळी केली. त्यानंतर ओमैमा सोहेल (0) हिलाही दीप्तिने पायचीत केले. यामुळे पाकिस्तान 6 षटकात 3 विकेट्स गमावत 33 धावा अशा स्थितीत पोहोचला.
तीन विकेट पडल्याने कर्णधार बिस्माह महारूफ आणि निदा दार (Nida Dar) यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळला. दोघींनी चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचली. महारूफ 35 चेंडूत 32 धावा करत बाद झाली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निदा दार हीची खेळी महत्वपूर्ण ठरली. तिच्यामुळे पाकिस्तानने 100चा आकडा पार केला. ती 37 चेंडूत 56 धावा करत नाबाद राहिली. तिने तिच्या या खेळीत 5 चौकार आणि एक षटकार खेचला. तिचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील सहावे अर्धशतक ठरले आहे.
भारताची गोलंदाजी पाहिली तर रेणुका सिंग (Renuka Singh) हिची कामगिरी म्हणावी तेवढी प्रभावशाली ठरली नाही. तिने 4 षटकात 24 धावा देत 1 विकेट घेतली. तसेच पूजाने 4 षटकात 23 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तिला दीप्तिने 4 षटके टाकत 27 धावांमध्ये 3 विकेट्स घेत चांगली मदत केली.
Sixth T20I half-century ✅
What a knock this has been from @CoolNidadar 🙌#INDvPAK | #WomensAsiaCup2022 pic.twitter.com/6TXIaAnc5S
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 7, 2022
भारताकडे पाकिस्तावर डबल हॅट्ट्रीक करण्याची संधी आहे. कारण मागील पाकिस्तानविरुद्धच्या पाचही सामन्यात भारतच विजेता ठरला आहे. तसेच भारताने हा सामना जिंकला तर संघ आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. तर पाकिस्तान पराभूत झाला तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय गोलंदाजांनी त्यांची कामगिरी योग्य बजावली असून आता फलंदाजांवर चांगली कामगिरी करण्याची वेळ आहे. या स्पर्धेत भारत तिन्ही सामने जिंकत गुणतालिकत पहिल्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2022: पूजा वस्त्राकरनंतर दीप्ति शर्माचा पाकिस्तानला ‘डबल’ झटका
INDvSA: काय सांगता, संजू सॅमसनने वनडेमध्ये सरासरीत विराट-धोनीला टाकले मागे