---Advertisement---

रोज मारतोय १५० षटकार! भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या फलंदाजाचा भयानक प्लॅन

On: बुधवार, ऑगस्ट 24, 2022 7:16 PM
Asif Ali
---Advertisement---

एशिया कप (Asia Cup) २०२२ला सुरू होण्यासाठी आता फक्त तीनच दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्टला श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात होणार आहे. तर चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे तो भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK)सामना २८ ऑगस्टला खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची कसून तयारी सुरू आहे. दोन्ही संघ पुढील तीन दिवस अधिक सराव करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच पाकिस्तानच्या एका फलंदाजाने त्याच्या खास सरावाने संघाचा भारताविरुद्धचा विजय निश्चित असल्याचेच वक्तव्य केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हा आधीच जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने विरोधी संघाच्या अडचणीत वाढ झाली. अशी स्थिती असताना आणखी एका फलंदाजाने त्याचे मनसुबे स्पष्ट केले आहे. आसिफ अली (Asif Ali) याचा एक व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. आता यामध्ये विशेष काय, तर अलीने या व्हिडिओमध्ये जे म्हटले ते ऐकून आश्चर्यचकीत व्हाल.

या व्हिडिओमध्ये अलीने म्हटले, “तो रोज १०० ते १५० षटकारांचा सराव करत आहे. जेणेकरून सामन्यात ५-७ षटकार मारता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दबाव असतो. मी ज्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतो तेथे अधिक धावा करण्याचा दबाव असतो. त्याचबरोबर टी२०मध्ये धावा अधिक गतीने कराव्या लागतात.”

“षटकारांचा सराव केल्याने पुढे सोईस्कर होणार आहे. आता वेळ हार्ड हिटींगची आहे. माझा विचार आहे जेथे चेंडू मारता येईल तेथे मारणार. एकसारखाच शॉट खेळण्याचा विचार नाही,” असेही अलीने पुढे म्हटले आहे.

https://twitter.com/TheRealPCB/status/1561953666155909121?s=20&t=87usa9BbLn_8JxyfQqohcw

अली हा पाकिस्तानच्या विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने २०१८मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण केले. तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद रिजवान हा देखील मैदानावर फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. यामुळे एकंदर पाकिस्तान संघ भारताला टक्कर देण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर
‘गिलने धवनची चिंता वाढवली! पण…’ माजी दिगग्जाने सांगितले
संघात बुमराह-शमी नसतील तेव्हा ‘त्याला’ संधी द्या! माजी दिग्गज गोलंदाजाने दिलाय मोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---