एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेच्या 15व्या हंगामात रविवारी (28 ऑगस्ट)भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना खेळला जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात फक्त दोन्ही संघातील खेळाडूंमध्येच नाहीतर प्रशिक्षकांमध्येही एक टक्कर पाहायला मिळणार आहे. आकडेवारी पाहिली असता भारताच्या मुख्य प्रशिक्षकावर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक वरचढ ठरत आहे. या दोघांची संघासाठीची कामगिरी पाहुया.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हे आता कोरोनातून बरे झाले आहेत. तर भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये आपल्याला द्रविड आणि वीवीएस लक्ष्मण दोघेही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर आपण द्रविड आणि सक्लेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांचे एशिया कपमधील कामगिरी जाणून घेऊया.
एशिया कपमध्ये द्रविडने पाकिस्तान विरुद्ध तीन सामने खेळले आहेत. मात्र यामध्ये त्यांची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यांना 2 सामन्यांत फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्यांनी 16च्या सरासरीने 31 धावा केल्या. 26 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. एवढेच नाही तर दोन सामन्यात भारत पराभूत झाला आहे, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. यावरून द्रविड संघात असताना भारत एशिया कपमध्ये जिंकला नाही आता त्यांना प्रशिक्षक म्हणून पहिला विजय मिळवायचा आहे.
एक शतक आणि दोन अर्धशतक
एशिया कपमध्ये द्रविडने 13 सामने खेळले आहेत. त्यातील 9 डावांमध्ये 37च्या सरासरीने 334 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये 104 धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. द्रविड संघात असताना भारत पहिल्यांदा पाकिस्तान विरुद्ध 20 जुलै, 1997ला खेळला होता. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. सामना सुरू होता तेव्हा पाकिस्तानने 9 षटकात 30 धावा करत 5 विकेट्स गमावल्या होत्या. वेंकटेश प्रसादने ४ विकेट्स घेतल्या होत्या.
सक्लेन मुश्ताक यांची एशिया कपमधील कामगिरी
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक सक्लेन मुश्ताक यांनी एशिया कपमध्ये भारताविरुद्ध एकच सामना खेळला आहे. हा सामनाही पावसामुळे वाया गेला. हा सामना 20 जुलै, 1997ला खेळला गेला.
फिरकीपटू मुश्ताक यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत भारताविरुद्ध 36 वनडे सामन्यांपैकी 20 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 14 सामन्यात पराभव झाला. दोन सामन्यांचा निकालच लागला नाही. मुश्ताक यांनी या सामन्यांमध्ये 24च्या सरासरीने 57 विकेट्स घेतल्या. तर 45 धावा देत 5 विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकही रुपया न भरता लाईव्ह पाहता येणार भारत-पाकिस्तान मॅच! फक्त कराव्या लागतील ‘या’ सोप्या गोष्टी
अल्टिमेट खो खो स्पर्धेत सलग पाचव्या विजयासह ओडिशा जगरनट्स प्लेऑफ साठी पात्र
“टॉस कोणी पण जिंकू द्या, मॅच तर भारताच जिंकणार”; माजी भारतीय सलामीवीराचे भाकीत