आशिया चषकाला विजेता संघ मिळाला आहे. आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 23 धावांनी विजयश्री प्राप्त करत सहाव्यांदा चषक जिंकला आहे. या खास कामगिरीनंतर श्रीलंकेचे खेळाडू विजयाचा जल्लोष साजरा करण्यात व्यस्त आहेत. अशातच या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित एक मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिस्ट्री गर्ल (Mystery Girl) म्हणजे क्रिकेट सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित एखाद्या सुंदर मुलीवर कॅमेरामनची नजर पडल्याने दर्शकांचे तिच्याकडे लक्ष वेधले जाते आणि सोशल मीडियावर तिची चर्चा रंगते. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांदरम्यान, आयपीएल सामन्यांदरम्यान बऱ्याचशा मिस्ट्री गर्ल चर्चेत आल्या आहेत. अशीच एक मिस्ट्री गर्ल आता आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात (Asia Cup Final) दिसली आहे.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (Sri lanka vs Pakistan) संघात दुबईच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानला चीयर करण्यासाठी आलेली एक महिला चाहती आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. काही सेकंदांसाठी सामन्याचे थेट प्रक्षेपण होत असताना या चाहतीवर कॅमेरा फिरवला गेला आणि ती दर्शकांच्या नजरेत आली. तिचा क्यूट रिऍक्शन देतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
एका चाहत्याने तर तिच्या व्हिडिओवर लिहिले आहे की, ‘अंतिम सामना पाहण्याचे एकमेव कारण ती होती.’ व्हिडिओत दिसत असलेल्या या मिस्ट्री गर्लवर श्रीलंकेच्या डावादरम्यान कॅमेरा गेला होता. यावेळीचा श्रीलंकेचा संघ 3 बाद 40 धावांवर खेळत होता.
https://twitter.com/Ishtiaq88467781/status/1569101377326161920?s=20&t=ZNtagD02nN5Eg8mnk6RFlw
दरम्यान अंतिम सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. या डावात श्रीलंकेकडून भानुका राजपक्षे याने झंझावाती खेळी केली. 45 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने त्याने 71 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून एकट्या मोहम्मद रिझवानची बॅट चालली. त्याने 55 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना जास्त धावा न करता आल्याने पाकिस्तानचा संघ 147 धावांवरच सर्वबाद झाला.
महत्वाच्या बातम्या-
भारताकडून 15 वर्षांनंतर पुन्हा टी20 विश्वचषकात उतरणार ‘ही’ जोडी, एकटा जबरदस्त फॉर्मात
‘पांडे’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, टी20 विश्वचषकासाठी संघ जाहीर झाल्यानंतर केली घोषणा
एकेकाळी भारत सोडणार होता ‘हा’ खेळाडू, आता आयुष्यातील पहिला टी20 विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज