एशिया कप (Asia Cup) २०२२ या स्पर्धेची वाट क्रिकेट चाहते आतुरतेने पाहत आहेत. दोन वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सामने टी२० किंवा वनडे प्रकारात खेळवले जातात. यंदा टी२० प्रकारातील हे सामने खेळवले जाणार आहेत. तर ही स्पर्धा युनायटेड अरब अमिराती येथे खेळली जाणार आहे. २७ ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. तर त्यातील पाच संघ पक्की झाली असून खेळाडूंचे नावेही जाहीर झाली आहेत. यामध्ये आपण सामने कधी होणार, कुठे आणि कोणत्या संघातील कोणत्या खेळाडूंचा संघात समावेश आहे हे जाणून घेऊ या.
टी२० प्रकारच्या या स्पर्धेत भारतीय संघाव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगानिस्तान यांचाही समावेश आहे. एशिया कप २०२२च्या क्वालिफायरचे सामने शनिवारपासून (२० ऑगस्ट) खेळले जाणार आहेत. त्यामध्ये सिंगापूर, हॉंगकॉंग, युएई आणि कुवेत या संघांचा समावेश आहे. तर त्यातील एक संघ प्रमुख संघाच्या यादीत समाविष्ट केला जाणार आहे. या संघाना दोन गटांमध्ये विभाजीत केले गेले आहेत. गट अ मध्ये भारत आणि पाकिस्तान बरोबर क्वालिफायरचा विजेता संघ असणार आहे. गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगानिस्तान हे संघ आहेत.
श्रीलंका क्रिकेट संघ या १५व्या हंगामाचा यजमान आहे. तर त्या देशात सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात आले. या स्पर्धेतील सामन्यांच्या प्रक्षेपणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहे. यामुळे भारतात या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. तर चाहते मोबाईलवरून हॉटस्टारवरही हे सामने पाहू शकतात. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहेत.
एशिया कपसाठी संघ-
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर
पाकिस्तान – बाबर आजम (कर्णधार), फखर जमान, हैदर अली, खुशदिल शाह, मोहम्मद रिजवान, आसिफ अली, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, हारिस रऊफ, नसीम शाह, शाहीन आफ्रीदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर.
अफगानिस्तान: मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान (उपकर्णधार), हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जादरान, उस्मान घनी, समीउल्लाह शिनवरी, अफसर जजई (विकेटकीपर), रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), अजमतुल्लाह ओमरजई, फजल हक फारूकी, करीम जनत, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, नूर अहमद, राशिद खान, फरीद अहमद मलिक,
राखीव खेळाडू: निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अशरफ
बांगलादेश: शाकिब अल हसन (कर्णधार), शब्बीर रहमान, अफिफ हुसैन, मोसद्देक हुसैन, महमुदउल्लाह रियाद, मेहेदी हसन, मोहम्मद सैफ़ुद्दीन, मेहेदी हसन मिराज, अनामुल हक, मुशफिकुर रहीम, परवेज हुसैन इमॉन, नुरुल हसन, हसन महमूद, मुस्ताफिजु़र रहमान, नासुम अहमद, इबादत हुसैन, तस्कीन अहमद
श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणातिलका, पथुम निसंका, कुशल मेंडिस, चरित असलंका, बानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानिंदु हसरंगा, महेश थीक्षाना, जेफरी वांडरसे, प्रवीण जयविक्रेमा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, चामिका फर्नांडो, मदुशंका, मथीशा पथिराना, दिनेश चांदीमल, नुवानिंदु फर्नांडो, कसुन रजिता
एशिया कप २०२२चे संपूर्ण वेळापत्रक
पहिला सामना- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (२७ ऑगस्ट, दुबई)
दुसरा सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान (२८ ऑगस्ट, दुबई)
तिसरा सामना- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (३० ऑगस्ट, शारजाह)
चौथा सामना- भारत विरुद्ध क्वालिफायर (३१ ऑगस्ट, दुबई)
पाचवा सामना- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (१ सप्टेंबर, दुबई)
सहावा सामना- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर (२ सप्टेंबर, शारजाह)
सातवा सामना- बी१ विरुद्ध बी२, सुपर-४ (३ सप्टेंबर, शारजाह)
आठवा सामना- ए१ विरुद्ध ए२, सुपर-४ (४ सप्टेंबर, दुबई)
नववा सामना- ए१ विरुद्ध बी१, सुपर-४ (६ सप्टेंबर, दुबई)
दहावा सामना- ए२ विरुद्ध बी२, सुपर-४ (७ सप्टेंबर, दुबई)
अकरावा सामना- ए१ विरुद्ध बी२, सुपर-४ (८ सप्टेंबर, दुबई)
बारावा सामना- बी१ विरुद्ध ए२, सुपर-४ (९ सप्टेंबर, दुबई)
अंतिम सामना- पहिले सुपर-४ विरुद्ध दुसरे सुपर-४ (११ सप्टेंबर, दुबई)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Second ODI: मॅच विनिंग प्रदर्शनानंतरही दीपक चाहरला का बसवलं बाकावर? कारण आले पुढे
२८१ सामने खेळलेल्या भारतीय क्रिकेटरचा क्रिकेटला अलविदा! सप्टेंबर महिन्यात खेळणार शेवटचा सामना
दुसऱ्या वनडेतून भारताचा ‘हा’ मॅच विनर खेळाडू बाहेर, झिम्बाब्वेतही २ प्रमुख बदल; पाहा प्लेइंग Xi