---Advertisement---

Asia Cup 2022: विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन

On: शनिवार, ऑक्टोबर 15, 2022 12:41 PM
Asia Cup Final INDvSL
---Advertisement---

महिला आशिया चषक (Asia Cup) 2022च्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका हे दोन संघ दाखल झाले. हा सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजता खेळला जाणार आहे. हा सामना बांगलादेशच्या सिल्हेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी झालेल्या नाणेफेकीत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेने उपांत्य फेरीत खेळवलेला संघ कायम ठेवला आहे, तर भारताच्या संघात राधा यादव हीच्या जागी दयालन हेमलता अंतिम अकरामध्ये आली आहे. भारताकडून फलंदाजीत शफाली वर्मा (161 धावा, 3 विकेट्स), जेमीमा रोड्रिग्ज (215 धावा) आणि गोलंदाजीत दीप्ति शर्मा (13 विकेट्स) या फॉर्ममध्ये आहेत. श्रीलंकेकडून फलंदाजीत हर्षिता मदवी (201 धावा) आणि इनोका रणवीरा (12 विकेट्स) या चांगल्या कामगिरी करत आहेत.

2000 च्या दशकात, जेव्हा ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळली जात होती, तेव्हा या दोन संघांनी प्रत्येक वेळी अंतिम फेरी गाठली होती आणि भारताने ते चारही सामने जिंकले होते. त्यानंतरच्या दशकात भारताने आपला खेळ उंचावला तर श्रीलंकेची कामगिरी कमी झाली. त्यामुळे त्यांनी 14 वर्षानंतर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा प्रवेश केला आहे.

श्रीलंकेविरुद्ध टी20मध्ये भारताची स्थिती मजबूत आहे, पण उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरुद्ध एका धावेने रोमहर्षक विजय खेचून आणल्याने श्रीलंकेलाही काही कमी लेखून चालणार नाही.

भारताने सहाव्यांदा आशिया चषक उंचावला आहे तर श्रीलंका पहिल्यांदा या स्पर्धेचे चॅम्पियन बनण्यास उत्सुक आहेत.

महत्वपूर्ण सामन्यासाठी दोन्ही संघाचे अंतिम अकरा खेळाडू-

भारत- शफाली वर्मा, स्म्रीती मंधना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, दयालन हेमलता, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकुर, राजेश्वरी गायकवाड.

https://twitter.com/BCCIWomen/status/1581179776685215744?s=20&t=02TZUggnHgetYcvmk-UwJQ

श्रीलंका- चमारी अट्टापटटू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हर्षिता मदवी, हसिनी परेरा, ओशादी रणसिंघे, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, मलशा शेहानी, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, अचिनी कुलसूरिया.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिटनेसमध्येही विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड! ‘या’ 23 भारतीय खेळाडूंनी केलीये एनसीएची वारी
अरे हे काय, कॅप्टन रोहितने तर पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग इलेवनच सांगून टाकली!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---