भारत आशिया चषक (Asia Cup)2022 स्पर्धेतून बाहेर पडला. यामुळे भारतीय संघाचे चाहते अधिकच नाराज आहे. गतविजेता भारताने या स्पर्धेची सुरूवात उत्तम केली होती. मात्र सुपर फोरमधील दोन्ही सामने गमावत ते स्पर्धेबाहेर झाले. भारताच्या या निराशाजनक कामगिरीमागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यातच भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भारताच्या पराभवाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटने खळबळ माजली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ‘आशिया चषकाचे आयोजक कोण? आणि आपण इतके वाईट का हरलो? बेटिंग? मी निरागसपणे विचारतो.’
आशिया चषक आशियाई क्रिकेट परिषद (ACC) द्वारे आयोजित केला जातो. या संघटनेचे अध्यक्ष जय शहा आहेत, जे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत. तसेच ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव आहेत.
Who are the organisers of the Asia Cup Cricket matches? And why we have been beaten so badly? Betting? I ask innocently
— Subramanian Swamy (@Swamy39) September 11, 2022
स्वामींच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. स्वामींच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे. तर लोकही आपापल्या परीने त्याचा अर्थ लावत आहेत. स्वामींची अशी ट्वीट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी इंडियन प्रीमियर लीग 2022चा विजेता संघ गुजरात टायटन्स यांच्यावरही अशी टीकात्मक ट्वीट केले होते. त्यामध्ये त्यांनी ‘सुरूवातीला गुजरात संघ कमकुवत वाटत होता. तो विजेतेपदाचा दावेदार असेल असे कोणालाच वाटले नव्हते, तर शेवटच्या सामन्यातील त्यांचा विजय आधीच निश्चित केला’, असे ट्वीट केले होते.
There is widespread feeling in intelligence agencies that the Tata IPL Cricket outcomes were rigged. It may require a probe to clear the air for which PIL may be necessary since Govt will not do it as Amit Shah’s son is defacto dictator of BCCI
— Subramanian Swamy (@Swamy39) June 2, 2022
या स्पर्धेत भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. यामुळे संघाच्या विजयाचा रथ असाच सुरू राहणार असे चाहत्यांना वाटले. कारण संघ सुपर फोरमध्ये पोहोचला होता आणि भारतीय संघाचा विश्वासातील फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा पण फॉर्ममध्ये परतला होता. मात्र सुपर फोरमध्ये पाकिस्तानने 5 विकेट्सने आणि यजमान संघ श्रीलंकेने 6 विकेट्सने पराभूत करत भारताची आशिया चषक जिंकण्याच्या स्वप्नाचा चुराडा केला.
यंदा हा चषक भारताने जिंकला असता तर संघाने हॅट्ट्रीक केली असती. भारताने 2016मध्ये एमएस धोनी आणि 2018मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या नेतृत्वाखाली सलग दोनवेळा आशिया चषक जिंकला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शिखरकडे पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व; बीसीसीआय करू शकते लवकरच घोषणा
संतापजनक! आशिया कप फायनल पाहण्यासाठी भारतीयांना ‘नो एन्ट्री’; धक्के देत काढले बाहेर
ब्रॉडची आणखी एक सुवर्णाक्षरी कामगिरी! मॅकग्राला मागे टाकत चढला यशाच्या शिखरावर