तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेला आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया खंडातील प्रमुख संघ या स्पर्धेत सहभागी होतील. चार वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपली कंबर कसली आहे. २०१६ नंतर प्रथमच टी२० प्रकारात आशिया चषक खेळला जाईल. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने या स्पर्धेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या स्पर्धेसाठीच्या झळाळत्या ट्रॉफीचे नुकतेच अनावरण केले गेले. युएई क्रिकेट बोर्डाचे चेअरमन शेख नाहयान मुबारक अल नाहयान यांना हा मान दिला गेला.
आशिया चषकाचे अनावरण अनावरण केले गेले असल्याचे ट्विट आशियाई क्रिकेट कौन्सिलकडून करण्यात आले. या ट्वीटमधील छायाचित्रात नाहयान यांच्या व्यतिरिक्त युएई क्रिकेट बोर्ड व श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी दिसून येत आहेत.
The #AsiaCup2022 trophy has officially arrived in the #UAE! 🏆
His Highness, Sheikh Nahayan Mabarak Al Nahayan, Minister of Tolerance and Coexistence and Chairman, Emirates Cricket Board with officials from Sri Lanka Cricket, Emirates Cricket and ACC were present at the event. pic.twitter.com/enxQfbzxw7
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 19, 2022
या आशिया चषकाचा पहिला टप्पा सध्या ओमान येथे सुरू झाला आहे. मुख्य स्पर्धेच्या सहाव्या संघासाठी युएई, सिंगापूर, हॉंगकॉंग व हात आजमावत आहेत. पात्रता फेरी जिंकणारा संघ अ गटात भारत व पाकिस्तान यांच्याशी भिडेल. दुसरीकडे ब गटात अफगाणिस्तान, श्रीलंका बांगलादेश यांचा समावेश केला गेला आहे. २०१८ मध्ये झालेल्या आशिया चषकात रोहित शर्माच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले.
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ–
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, अवेश खान, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘संजूची आणखी एखा विक्रमाला गवसणी!’ आता थेट प्रशिक्षक द्रविड अन् धोनीच्या यादीत झाला सामील
‘…पाकिस्तानने ५० षटके घेतली असती’, भारतावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानी दिग्गजाचाच टोला