---Advertisement---

पुन्हा दिसले ‘माहीराट’चे प्रेम; विराट म्हणाला, ‘कसोटीची कॅप्टन्सी सोडल्यानंतर फक्त धोनीने…’

On: सोमवार, सप्टेंबर 5, 2022 3:12 PM
Virat Kohli and MS Dhoni.jpg
---Advertisement---

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा मागील काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म होता. यामुळे त्याच्यावर बऱ्याच आजीमाजी क्रिकेटपटूंनी टिका केल्या होत्या. मोठ्या प्रमाणात टिका होत असताना यावर तो शांत राहिला. तर संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेत तो फॉर्ममध्ये परतला आहे. या स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक केले आहे. मात्र भारताला प्रथमच या स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी (4 सप्टेंबर) पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट व्यक्त झाला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) याने 15व्या आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 35, हाँगकाँग विरुद्ध नाबाद 59 आणि सुपर फोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध 60 धावा केल्या आहेत. सामन्यानंतर त्याने त्याच्या फॉर्मविषयी मत मांडले आहेत. तर यादरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना त्याने म्हटले, जेव्हा मी कसोटीचे कर्णधारपद सोडले, तेव्हा मला फक्त एका खेळाडूचाच मॅसेज आला होता आणि मी त्याच्यासोबत खेळलोही आहे. तो एमएस धोनी (MS Dhoni) आहे.

“बाकी लोकांकडेही माझा फोन नंबर होता. फक्त धोनीने मला मॅसेज केला अशा गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या असतात. मी माझे आयुष्य इमानदारीने जगत आहे. पुष्कळ लोकांनी मला माझ्या खेळाबाबत सल्लेही दिले आहेत. कोण काय बोलतो याकडे मी लक्ष देत नाही. सध्या संघातील वातावरण योग्य आहे,” असेही विराट पुढे म्हटला आहे. त्याबरोबरच त्याने आमची बॉन्डिग कशी आहे हे पण स्पष्ट केले.

विराट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यातील संबंध नीट नव्हते. त्याचे 2021मध्ये टी20 विश्वचषकानंतर वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. तसेच 2022मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पराभवानंतर त्याने कसोटी कर्णधारपदाचा त्याग केला होता. त्याने सोशल मीडियावरून हे जाहीर केले होते. मात्र भारताच्या इतिहासात तो सर्वाधिक कसोटी सामने (40) जिंकणारा कर्णधार आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलियामध्ये भारताला पहिल्यांदा कसोटी चॅम्पियन बनण्यात मदत केली होती. विदेशी भुमिवर संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत.

https://www.instagram.com/reel/CiHslKJKu8w/?utm_source=ig_web_copy_link

विराटचा फॉर्म परतला ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. कारण भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 3-3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर लगेचच टी20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेहमी भारतीय संघावर निशाणा साधणारा पाकिस्तानी क्रिकेटर उतरला अर्शदीपच्या समर्थनार्थ, म्हणतोय..
‘या’ सुंदर चाहतीने मैदानात येऊन वाढवली अनुष्काची चिंता? म्हणतीये, ‘फक्त विराटसाठी…’
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---