---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन आली समोर, बाबरच्या संघात पाच महत्वाचे बदल

Babar Azam Mohammad Rizwan Shaheen Afridi
---Advertisement---

आशिया चषक 2023 शेवटच्या टप्प्यात आला आहे. गुरुवारी (13 सप्टेंबर) श्रीलंका आणि पाकिस्तान संघ आमने सामने असणार आहेत. सुपर फोर फेरीतील या पाचव्या सामन्यासाठी पाकिस्तानने एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली. या संघात पाच महत्वपूर्ण बदल पाहायला मिळाले.

पाकिस्ताचने वेगवान नसीम शहा दुखापतीमुळे राहिलेल्या आशिया चषक सामन्यांमधून बाहेर झाला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात नसीमसह हॅरिस रौफ यालाही दुखापत झाली होती. याच कारणास्तव रौफ देखील श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी (14 सप्टेंबर) खेळणार नाहीये. त्याव्यतिरिक्त फखर झमान, सलमान अली आगा आणि फहीम अश्रफ यांनाही पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. मोहम्मद हॅरिस, सौद शकील, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जुनियर आणि जमान खान यांनी श्रीलंकेविरुद्ध संधी दिली गेली आहे.

https://x.com/TheRealPCB/status/1701968833886486850?s=20

(Asia Cup 2023 । Pakistan make 5 changes in their playing XI for virtual knockouts match against Sri Lanka.)

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन –
मोहम्मद हॅरिस, ईमाम-उल हक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन शाह अफ्रिदी, मोहम्मद वसीम जुनियर, जमान खान.

महत्वाच्या बातम्या – 
रोहित-विराटच्या वयाचा मुद्दा निघताच इंग्लिश दिग्गजाने दिले अँडरसनकचे उदाहरण, म्हणाला…
अफगाणिस्तानचे वर्ल्डकप स्कॉड घोषित, विराटच्या विरोधकांचे संघात कमबॅक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---