भारत विरुद्ध बांगलादेश संघात आशिया चषक 2023 स्पर्धेत 15 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाला 6 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यात बांगलादेशचा 20 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज तंजीम हसन याने पदार्पण केले. या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने 2 विकेट्स घेतल्या. त्यापैकी एक विकेट कर्णधार रोहित शर्मा याची होती. सामन्यानंतर रोहितची विकेट घेण्याविषयी त्याने मोठे विधान केले.
काय म्हणाला तंजीम?
सामन्यानंतर तंजीम हसन (Tanzim Hasan) म्हणाला की, “रोहित भाईची पहिली विकेट एक ड्रीम विकेट होती. मी लाईन आणि लेंथवर लक्ष देतो. मला अशाप्रकारेच यश मिळते. माझ्या संघाला जेव्हाही माझ्याकडून दीर्घ षटकांच्या गोलंदाजीची गरज असते, तेव्हा मी यासाठी मानसिकरीत्या तयार होतो. अखेरच्या दोन षटकात 8 धावांचे आव्हान होते, त्यामुळे मी यॉर्कर चेंडू टाकण्याचा निर्णय घेतला. आम्ही भारताविरुद्ध खूप चांगल्या विजयासोबत परत जात आहोत.”
तंजीमची शानदार गोलंदाजी
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 265 धावा केल्या होत्या. या आव्हानाच पाठलाग करण्यासाठी भारताकडून सलामीला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल उतरले होते. तसेच, बांगलादेशकडून भारताच्या डावातील पहिले षटक पदार्पणवीर तंजीम हसन साकिब (Tanzim Hasan Sakib) टाकत होता. तंजीमने षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ‘हिटमॅन’ला अनामूल हककडून झेलबाद केले. यावेळी रोहितला 2 चेंडू खेळून शून्यावर तंबूचा रस्ता धरावा लागला.
Asia Cup 2023: Bangladesh 🆚 India | Super Four (D/N) 🏏
Moments of Bangladesh's Bowling 🇧🇩 ✨#BCB | #AsiaCup | #BANvIND pic.twitter.com/1Ii4mLWn4b
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 15, 2023
रोहितनंतर तंजीमने तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर तिलक वर्मा याचीही विकेट काढली. तिलकलाही 5 धावांवर समाधान मानावे लागले. तंजीमने सामन्यात एकूण 7.5 षटके गोलंदाजी केली. यावेळी त्याने 32 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. एवढंच नाही, तर तंजीमने अखेरच्या षटकात 12 धावांचाही बचाव केला. तंजीमची शानदार गोलंदाजी पाहून क्रिकेटप्रेमीही त्याच्यावर फिदा झाले. (asia cup 2023 ind vs ban tanzim hasan sakib says rohit sharma was a dream wicket)
हेही वाचा-
Asia Cup Finalपूर्वीच भारतीय संघाचा स्टार खेळाडू Injured, शेवटच्या क्षणी ‘हा’ पठ्ठ्या कोलंबोला रवाना
बिग ब्रेकिंग! श्रीलंकेला मोठा धक्का, स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त; भारताविरुद्ध खेळणार नाही Final