पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना रद्द झाल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात नेपाळचा 10 विकेट्सने फडशा पाडला. या सामन्यात विजय मिळवताच भारतीय संघ आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीत पोहोचला. नेपाळविरुद्ध कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी नेपाळने प्रथम फलंदाजी करत 230 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी केली होती. या दोघांनीही मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. दोघांनीही केलेल्या भागीदारीमुळे अनेक विक्रम रचले गेले.
रोहित-गिलची विक्रमी भागीदारी
भारताच्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल (Rohit Sharma And Shubman Gill) या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी रचली. तसेच, भारताला 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून 10 विकेट्सच्या विजयात ही पाचवी सर्वात मोठी सलामी भागीदारी आहे. भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 10 विकेट्सने मिळवलेल्या विजयातील सर्वात मोठी सलामी भागीदारी ही वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या नावावर आहे. या दोघांनीही 2009मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली होती.
वनडेत 10 विकेट्सने मिळवलेल्या विजयात भारतासाठी सर्वात मोठी सलामी भागीदारी
201 धावा- वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर
197 धावा- सचिन तेंदुलकर आणि सौरव गांगुली
192 धावा- शिखर धवन आणि शुबमन गिल
147 धावा- रोहित शर्मा आणि शुबमन गिल*
वनडे आशिया चषकात भारताकडून सर्वात मोठी सलामी भागीदारी करण्याचा विक्रम रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या नावावर आहे. या खेळाडूंनी 2018मध्ये पाकिस्तानविरुद्ध 210 धावांची सलामी भागीदारी केली होती. रोहित आणि शुबमन (Rohit And Shubman) यांनी पहिल्या विकेटसाठी 147 धावांची केलेली भागीदारी आशिया चषकातील तिसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. रोहित आणि शुबमनने वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनाही मागे टाकले आहे. या दोघांनी आशिया चषकात 2008मध्ये हाँगकाँगविरुद्ध 127 धावांची सलामी भागीदारी केली होती.
वनडे आशिया चषकात भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करणारे खेळाडू
210 धावा- रोहित शर्मा आणि शिखर धवन, (2018)
161 धावा- सचिन तेंदुलकर आणि मनोज प्रभाकर, (1995)
147 धावा- रोहित शर्मा आणि शुबमन गिल, (2023)*
127 धावा- वीरेंद्र सहवाग आणि गौतम गंभीर, (2008) (asia cup 2023 india vs nepal rohit sharma shubman gill record opening partnership stand know here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’सारखा कुणीच नाही! Asia Cupमध्ये रोहितने घडवला इतिहास, बनला सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल भारतीय
Asia Cup 2023मधून मोठी बातमी! Super- 4 फेरीतील सामन्यांबद्दल घेतला ‘हा’ निर्णय, INDvPAK सामना होणार फिक्स