यावेळी आशिया चषक 2023 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघ भूषवत आहेत. स्पर्धेतील 13 सामने पाकिस्तान (4) आणि श्रीलंका (9) या दोन्ही देशात खेळवले जात आहेत. अशात या दोन्ही यजमानांनी आपापले पहिले सामने जिंकत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळला पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा फडशा पाडला.
आशिया चषक 2023मध्ये पहिल्या विजयानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराची प्रतिक्रिया
गुरुवारी (दि. 31 ऑगस्ट) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (Bangladesh vs Sri Lanka) संघात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकत बांगलादेशने फलंदाजीचा निर्णय घेतला होता, पण हा निर्णय श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. बांगलादेशने 10 विकेट्स गमावत फक्त 164 धावा केल्या होत्या. हे आव्हान श्रीलंकेने 5 विकेट्स राखून पूर्ण केले आणि सामना जिंकला. यासह श्रीलंकेने वनडे इतिहासातील सलग सर्वाधिक 11 सामने जिंकणारा संघ होण्याचा मानही मिळवला. या मोठ्या विजयानंतर कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) याने प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला शनाका?
दसून शनाका म्हणाला, “ज्याप्रकारे आमच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली, त्यांनाच या विजयाचं पूर्ण श्रेय दिले पाहिजे. विशेषत: महीश थीक्षणाने सुरुवात केली, त्यानंतर धनंजय डी सिल्वा आणि मथीशा पथिराना. यांनी शानदार गोलंदाजी केली. ही खेळपट्टी कठीण होती.”
आपल्या फलंदाजांचे कौतुक करत शनाका म्हणाला, “ज्याप्रकारे सदीरा समरविक्रमाने फलंदाजी केली, आज त्याचा दिवस होता. तसेच, चरिथ असलंका मागील 2 वर्षांपासून शानदार प्रदर्शन करत आला आहे. हे श्रीलंकन क्रिकेटसाठी चांगले संकेत आहेत.”
सामन्याविषयी थोडक्यात
दुसरीकडे, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याविषयी बोलायचं झालं, तर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली होती. मात्र, त्यांना पूर्ण 50 षटके खेळता आले नाहीत. त्यांचा संघ 42.4 षटकात 164 धावाच करू शकला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाची सुरुवातही चांगली झाली नव्हती.
परंतु मधळ्या फळीतील दोन फलंदाज सदीरा समरविक्रमा (54) आणि चरिथ असलंका (नाबाद 62) यांच्या अर्धशतकी खेळीने संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेने 39 षटकात 5 विकेट्स गमावत 165 धावा केल्या आणि 5 विकेट्सने सामना जिंकला. या सामन्यात आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणारा गोलंदाज मथीशा पथिराना याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 7.4 षटके गोलंदाजी करताना 32 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. (asia cup 2023 sri lankan captain dasun shanaka credit to ms dhoni special csk this bowler big win vs bangladesh)
हेही वाचाच-
IND vs PAK महामुकाबल्यापूर्वी माजी खेळाडूचा बाबरला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘भारताविरुद्ध हारलो तरीही…’
पाकिस्तानविरुद्ध जिंकायचंय? तर भारतीय संघाला ‘या’ 3 समस्यांवर काढावा लागेल तोडगा