आगामी आशिया चषक 2023साठी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. 30 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या आशिया चषकात भारताला आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. 2 सप्टेंबर रोजी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने असतील. भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने या सामन्याविषयी खास प्रतिक्रिया दिली.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना म्हटल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता सहाजिकच आहे. मात्र, मागच्या काही वर्षांमध्ये भारत पाकिस्तान सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2008 साली मुंबई हल्ल्यानंतर दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या द्विपक्षिय मालिका बंद झाल्या. त्यानंतर फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकात हे दोन संघ एकमेकांसोबत खेळताना दिसतात. चाहते भारत-पाकिस्तान सामन्यासाठी वाट पाहत असल्यामुळे सामन्याविषयी आतापासूनच जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेकांना भारत-पाकिस्तान सामन्यात खेळणाऱ्या खेलाडूंची परिस्थिती काय असते, याविषयी जाणून घ्यावेसे वाटते. स्वतः विराट कोहलीने याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. (Asia Cup 2023)
नुकत्याच दिलेल्या एखा मुलाखतीत विराट कोहली (Virat Kohli) याविषयी बोलला. विराटच्या मते सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी या गोष्टी जाणवतात. पण प्रत्यक्ष मैदानात उतरल्यानंतर बाहेरच्या चर्चांचा काही फरक पडत नाही. पाकिस्तानविरुद्ध खेळतानाही एकाद्या इतर संघाविरुद्ध खेळल्यासारखे वाटते, असे विराट म्हणाला.
“बाहेर असणारे वातावरण इतर सामन्यांपेक्षा भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी वेगळे असते, हे मालाही मान्य आहे. अशात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी तयार होणाऱ्या बाहेरच्या वातावरण दुर्लक्ष करता येत नाही. पण एक खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यानंतर ही एक सर्वसाधारन सामना असतो. मी आधीही याबाबत बोललो आहे. बाहेरच्या परिस्थितीमुळे तुम्हाला काही गोष्टी जाणवू शकतात. जोपर्यंत तुम्ही मैदानात पोहोचत नाही, तोपर्यंत याबाबती तुमच्या मनात उत्सुकता असते. नंतर मात्र एखाद्या दुसऱ्या सामन्याप्रमाणेच भावना असतात,” असे विराटने दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
Unveiling the emotions of the biggest rivalry! 👏🏻@imVkohli speaks on how the India Pakistan clashes are larger than life from outside and makes it an experience to cherish! 😍
Tune-in to #INDvPAK on #AsiaCupOnstar
Sep 2 | 2.00 PM Onwards | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/Zbn19IpABW— Star Sports (@StarSportsIndia) August 17, 2023
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान संघ मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात मेलबर्नमध्ये भिडले होते. भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता. विराट कोहलीने 19व्या षटकात हॅरीस रउफच्या चेंडूवर दोन षटकार मारले होते. विराटची 82 धावांची खेळी भारतासाठी मॅच विनिंग ठरली होती. (Asia Cup 2023 Virat Kohli talks about the high voltage match against Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
‘जेव्हा सर्वकाही ठीक सुरू होते…’, पृथ्वी शॉ बाबत माजी सलामीवीर फलंदाजाची मोठी प्रतिक्रिया
द्रविड आणि जय शहांमध्ये दोन तास चर्चा! बीसीसीआयचा आशिया कप आणि वर्ल्डकप मोड ऑन