एशिया कप स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आपल्या 7 विकेट गमवल्या होत्या. केदार जाधवने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेतली.
लिंटन दासच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने भारतासमोर 223 धावांचे आव्हान उभे केेले. या लक्षाचा पाठलाग करताना रोहित शर्मा 48, दिनेश कार्तिक 37 आणि धोनीने 36 धावांची खेेळी केली. भारताकडून कुलदीप यादवने 3 गडी बाद केले तर केदार जाधवने 2 गड्यांना माघारी पाठवले.
सामन्यातील महत्वाची आकडेवारी-
-हा विजय भारतीय क्रिकेटसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा हा सर्व प्रकारच्या सामन्यातील 700 वा विजय ठरला आहे.
-एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्यांदा, भारताने वैयक्तिकरित्या कोणत्याही खेळाडूने 50 पेक्षा अधिक धावा न करता हा सामना जिंकला आहे.
-1 जानेवारी 2017 पासून भारताने 200 ते 300 च्या मधील धावांचे लक्ष असलेला एकही सामना गमावला नसून या दरम्यान खेळलेल्या 15 सामन्यात भारताने 14 विजय मिळवले तर एक सामना बरोबरीत सुटला.
-2018 मध्ये भारताच्या महेंद्रसिंग धोनीने 10 डावात 28.12 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याची धावगती 67.36 ची होती. त्याच्या कारकिर्दीत प्रथमच त्याने एवढ्या कमी धावगतीने धावा केल्या आहेत.
-एशिया कप 2018 स्पर्धेत रोहितने 317 धावा पुर्ण केल्या आहेत. शिखर धवननंतर (342) तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशच्या मिशफिकुर रहिमने 302 धावा केल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-बांगलादेशचा कर्णधार मशरफी मोर्तुझाने अंबाती रायडूला बाद करत वन-डे क्रिकेटमध्ये 250 विकेट पुर्ण केल्या आहेत. बांगलादेशकडून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे.
-मेहीदी हसन हा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू आहे की ज्याने एकाच सामन्यात सलामीला फलंदाजी केली आणि सामन्यातील पहिले षटक टाकले.
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियाच्या या ११ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
–केदार जाधवने विजयी धाव घेत टीम इंडियाला मिळवून दिले सातव्यांदा एशिया कपचे विजेतेपद
–आशिया कपमधील खराब कामगिरीचा मोहम्मद आमिरला मोठा फटका