मलेशियात चालू असलेल्या महिला आशिया चषक टी20 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध बांग्लादेश संघात अंतिम सामना रंगणार आहे.
शनिवारी भारताने पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले होेते. तर बांग्लादेशने यजमान मलेशियाविरुद्ध 70 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे.
भारताने या स्पर्धेत आत्तापर्यंत थायलंड, मलेशिया, पाकिस्तान आणि श्रीलंका विरुद्ध विजय मिळवला आहे. तर भारताला पहिल्यांदाच बांग्लादेशाने पराभवाचा धक्का दिला होता.
भारताने आत्तापर्यंत आशिया चषकात 37 सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात पराभव पत्करला आहे.
त्याचबरोबर भारताला पराभवाचा धक्का देणारा बांग्लादेशचा संघही पहिले आशिया चषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल.
त्यांनी या स्पर्धेत थायलंड, मलेशिया, पाकिस्तान आणि भारताविरुद्ध विजय मिळवला असुन श्रीलंकेविरुद्ध पराभव पत्कराला आहे.
या सामन्याला उद्या सकाळी 11.30 वाजता सुरवात होणार आहे.
यातून निवडले जातील 11 जणींचे संघ:
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), तनिया भाटिया , एकता बिष्त, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधाना, मोना मेश्राम, शिखा पांडे, अनुजा पाटील, मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, दिप्ती शर्मा, पूजा वास्त्राकार, पूनम यादव.
बांग्लादेश: सलमा खतुन(कर्णधार),शर्मिन सुलताना, अयाशा रहमान, निगर सुल्ताना, रुमाना अहमद, जहांनारा आलम, फरगाना हुक, खादीजा तुल कुबरा, फहिमा खतुन, नहादा अक्तर, संजिता इस्लाम, शामिमा सुल्ताना, लिली रानी, पन्ना घोष, जानतल फेरडस