भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या 15व्या हंगामात पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. मधल्या फळीतील फलंदाजांनीही लक्ष्याचा पाठलाग करताना धावफलक हलता ठेवला. हे सगळे सुरळित चालले असताना भारताच्या एका सलामीवीराने संघाची चिंता वाढवली आहे. तो पाकिस्तानविरुद्ध तर गोल्डन डकवर बाद झाला. यामुळे संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भारताचा उजव्या हाताचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) पाकिस्तान विरुद्ध फलंदाजीसाठी आला. त्याचा तो यावर्षीचा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. तर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022 नंतर तो तिसऱ्यांदा फलंदाजीसाठी आला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याला नवखा गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याने सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले. शून्यावर बाद झालेल्या राहुलसाठी हॉंगकॉंग विरुद्धचा सामना महत्वाचा असणार आहे. आशिया चषकात भारत विरुद्ध हॉंगकॉंग सामना बुधवारी (31 ऑगस्ट) दुबई येथे खेळला जाणार आहे.
हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात राहुल पुन्हा धावा करण्यात अपयशी झाला तर त्याचे अंतिम अकरातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण तो धावा करत नसल्याने संघाचे समीकरण बिघडत चालले आहे. भारताकडे एकच डाव्या हाताचा फलंदाज आहे. ज्याची कमतरता भारताला पाकिस्तान विरुद्ध जाणवली. मात्र चौथ्या क्रमांकावर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्याने विजयामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली.
राहुलला अंतिम अकरामधून वगळले तर रिषभ पंत याला संधी दिली जाऊ शकते. पंत हा डाव्या हाताचा फलंदाज असून तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. असे झाले तर, विराट कोहली (Virat Kohli) किंवा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे सलामीला येऊ शकतील. रोहितने इंग्लडमध्ये सूर्यासोबत सलामीला फलंदाजी केली होती आणि त्या सामन्यात भारताला चांगली सुरूवातही करून दिली होती.
राहुलने 57 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 39.8च्या सरासरीने 1831 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 2 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेहवागने काढला बाप, अख्तरला चढला संताप! म्हणाला, ‘असं बोलला असता तर…’
पदार्पणाच्या सामन्यातच भारताने झोडपल्यानंतर नसीम शाह मैदानातच लागला रडायला! व्हिडिओ होतायेत व्हायरल
बुमराह-शमीची कमतरता आता जाणवणार नाही; भारताचा ‘हा’ गोलंदाज विरोधकांसाठी ‘अकेला ही काफी है!’