पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतीमुळे एशिया कप (Asia Cup)२०२२च्या हंगामातून बाहेर झाला आहे. तो बाहेर जरी झाला नसता तरी पाकिस्तान विरुद्ध भारताला विजय मिळवण्यापासून कोणीच रोखू शकले नसते. कारण भारताकडे एक असा खेळाडू आहे जो संघात आला आहे तेव्हापासून त्याने संघाला पराभूत होऊच दिले नाही. अंतिम अकरामधील त्याचे स्थान हे विरोधी संघाच्या पराभवाचे मुख्य कारण बनले आहे. आता पाकिस्तानचीही अशीच स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे.
भारताचा अष्टपैलू दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने जेव्हापासून भारतीय संघात पदार्पण करत जेवढे सामने खेळले आहेत, तेवढ्या सगळ्या सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण यावर्षीच अहमदाबाद येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यातून केले आहे. आतापर्यंत त्याने भारतासाठी १६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सगळ्या सामन्यांमध्ये भारतच जिंकला आहे.
पदार्पण करताच लागोपाठ १६ सामने जिंकण्याचा विक्रम
हुड्डाने भारतासाठी ७ वनडे आणि ९ टी२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने उत्तम कामगिरी जरी नाही केली तरी भारताला विजय मिळाला आहे. यामुळे तो भारतासाठी लकी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पणात एका क्रिकेटपटूने सलग १६ सामने जिंकणे हा एक विक्रम बनला आहे. सध्या हा विक्रम हुड्डाच्या नावावर आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये हुड्डाची सरासरी ५०च्या पुढे असून त्याच्या नावावर एक शतकही आहे.
एशिया कप…पाकिस्तान आणि हुड्डा
एशिया कप या स्पर्धची सुरूवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान २८ ऑगस्टला समोरासमोर येणार आहेत. या सामन्यात जर हुड्डा भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये असला तर पाकिस्तानचा पराभव शक्य आहे. असे झाले तर पदार्पणानंतर त्याचा १८वा विजय असेल.
१७वा विजय झिम्बाब्वे विरुद्ध मिळेल
सध्या भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये भारताने पहिल्या दोन वनडे सामन्यात विजय मिळवला आहे. तर आता मालिकेतील शेवटचा आणि तिसरा वनडे सामना खेळणे बाकी आहे. हुड्डा या सामन्यात नाही खेळला आणि तो थेट पाकिस्तान विरुद्ध खेळला तर त्या सामन्यात मिळणारा विजय त्याच्या पदार्पणातील १७वा विजय ठरेल. मात्र त्याने झिम्बाब्वे विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळण्याची आशा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
टीम इंडियाचा ‘डबलवार’, झिम्बाब्वेला हरवत पाकिस्तानच्या ३२ वर्षे जुन्या विश्वविक्रमाला तडा
शेवटचा सामना जिंकत ‘राहुल आर्मी’ धोक्यात आणणार पाकिस्तानचा विक्रम! वाचा काय आहे गणित
आता काय म्हणावे? मोठे मनाने ज्याला ऑटोग्राफ दिला, त्याच चाहत्याने चोरलं खेळाडूचं ५६ लाखांचं घड्याळ






