---Advertisement---

रविवारी खेळ पावसाचा! भारत-पाकिस्तान सामना सोमवारी होणार पूर्ण, टीम इंडिया 2 बाद 147

On: रविवार, सप्टेंबर 10, 2023 9:04 PM
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला जात होता. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित करण्यात आलेले. मात्र, भारतीय संघाने शानदार सुरुवात केल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने दिवसाचा पुढील खेळ होऊ शकला नाही. अखेर हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (11 सप्टेंबर) खेळला जाईल.

साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्याने या सामन्यावर सर्वांचे लक्ष होते. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी जबरदस्त सुरुवात देताना शतकी भागीदारी केली. गिलने आक्रमक 58 तर रोहितने 56 धावा केल्या. 121 धावांची सलामी दिल्यानंतर ते तंबूत परतले. त्यानंतर विराट कोहली व केएल राहुल यांनी भारताचा डाव पुढे नेला. भारतीय डावातील 24.1 षटके झालेली असताना पावसाचे आगमन झाले. त्यावेळी भारतीय संघाने दोन बाद 147 धावा केलेल्या.

रात्री नऊ वाजेपर्यंत मैदान खेळण्यासाठी तयार न झाल्याने अखेर सामना राखीव दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी (11 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता भारतीय संघ 24.1 षटकांच्या पुढे सुरू होईल. सोमवारी हा सामना पूर्ण होण्याची अपेक्षा सर्वांना असेल.

(Asia Cup India Vs Pakistan Day 1 called off due to rain)

हेही वाचाच-
बदला घेतलाच! पहिल्याच ओव्हरमध्ये हिटमॅनने शाहिनला भिरकावला, पाहा कडक सिक्स
श्रेयस पुन्हा दुखापतग्रस्त! पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल, वर्ल्डकपआधी वाढली चिंता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---