भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक स्पर्धेची तयारी करत आहे. 30 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. आशिया चषकाचे सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जाणार आहे. या संदर्भात चॅनेलने 1 मिनीटांचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय चाहते दिसत आहेत. सोबत विराट कोहली याला देखिल दाखवण्यात आहे. मात्र संपूर्ण व्हिडिओमध्ये रोहित शर्मा एकदाही दिसला नाही. यामुळे रोहीतचे चाहते नाराज झाले आहेत. चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
स्टार स्पोर्टच्या प्रोमो व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दिसला नाही. यामुळे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत आहेत. प्रोमोच्या सुरुवातीला भारतीय चाहत्यांना भारतीय संघाचा जयजयकार करताना दाखवण्यात आले आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये भारतीय संघाच्या सामन्यांबाबत अनेक अस्थिर क्षण दाखवण्यात आले आहेत. यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) ची प्रतिक्रियाही व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी दाखवण्यात आली आहे. पण रोहित भारतीय संघाचा कर्णधार असून या प्रोमोमध्ये कुठेच दिसत नाही. त्याला फक्त व्हिडिओच्या शेवटी पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे. असे चाहत्यांचे मत आहे.
Through thick & thin, fans always have their hands up in support of #TeamIndia. Now, we back them to conquer both Asia & the world! 🙌🏻🏆
Tell us your favourite #HandsUpForIndia moment in the comments.
Tune-in to #AsiaCupOnstar
Aug 30 Onwards | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/z7zSlbqBfz— Star Sports (@StarSportsIndia) August 8, 2023
भारतीय संघ आशिया चषकात पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर संघाचा दुसरा सामना 4 सप्टेंबरला नेपाळविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ सुरवातीचे दोन्ही सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळणार आहे. यावर्षी आशिया चषक हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवला जात आहे. यामुळे 4 सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघाला विश्वचषकापूर्वीच संघाची कल्पना येईल
आशिया चषक स्पर्धा विश्वचषक 2023च्या पूर्वी होणार असल्याने भारतीय संघ आशिया चषकात संपूर्ण ताकदीने खेळायला उतरेल. अशी आशा सर्व क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत विश्वचषक संघाची ओळख होण्याची शक्यता आहे. कारण लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (asia cup new promo focuses on only virat kohli fans ask where is captain rohit sharma)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघात खळबळ! दिग्गज खेळाडूने संघाशी तोडला संबंध, अमेरिकडून मिळाली ऑफर
‘आम्ही दोन दिवसात…’, विश्वचषक तयारीविषयी भारतीय कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया