---Advertisement---

आशिया कप क्वालिफायर्सचे वेळापत्रक झाले जाहीर; हे चार संघ भारत-पाकिस्तानशी भिडण्याचे दावेदार

On: बुधवार, ऑगस्ट 10, 2022 4:53 PM
---Advertisement---

आशिया चषक २०२२ पात्रता फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने बुधवारी (१० ऑगस्ट) यासंदर्भात माहिती दिली. चार संघांची ही पात्रता फेरी २० ऑगस्टपासून ओमानमध्ये होणार आहे. यामध्ये यूएई, हाँगकाँग, कुवेत आणि सिंगापूर हे संघ एकमेकांशी भिडतील. पात्रता फेरीतील विजेत्या संघाला पाकिस्तान आणि भारतीय संघासह आशिया चषकाच्या मुख्य फेरीत स्थान मिळेल. मुख्य फेरीचे सामने २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये मध्ये होणार आहेत. यासाठी ५ संघ आधीच पात्र ठरले आहेत. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे संघ मुख्य फेरीचा दुसऱ्या गटात सहभागी आहेत.

आशिया चषकातील पात्रता फेरीचे सामने २० ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान होतील. पहिल्या दिवशी हाँगकाँग आणि सिंगापूर यांच्यात सामना होणार आहे. प्रत्येक संघाला ३ सामने खेळण्याची संधी मिळेल. ओमान क्रिकेटचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष पंकज खिमजी म्हणाले की, “आम्ही पात्रता फेरीचे यजमानपद भूषवण्यास उत्सुक आहोत. आम्हाला संधी दिल्याबद्दल आशियाई क्रिकेट परिषद आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे आम्ही आभारी आहोत.” यापूर्वी आशिया चषकाच्या पात्रता फेरीचे आणि मुख्य फेरीचे दोन्ही सामने श्रीलंकेत होणार होते. मात्र, श्रीलंकेतील आर्थिक व राजकीय आणीबाणीमुळे ही स्पर्धा तेथून हलविण्यात आली आहे. स्पर्धा आखाती देशात होत असली तरी, स्पर्धेचे आयोजक अद्यापही श्रीलंकाच आहे.

आशिया चषकाचे आयोजन टी२० प्रकारात केवळ दुसऱ्यांदा होत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये टी२० प्रकारात आशिया चषक खेळला गेला होता. त्यावेळी भारताने विजेतेपद पटकावले होते.

पात्रता फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक-

२० ऑगस्ट- सिंगापूर विरुद्ध हॉंगकॉंग

२१ ऑगस्ट- कुवेत विरूद्ध युएई

२२ ऑगस्ट- युएई विरूद्ध सिंगापूर

२३ ऑगस्ट- हॉंगकॉंग विरुद्ध कुवेत

२४ ऑगस्ट- सिंगापूर विरुद्ध कुवेत

२४ ऑगस्ट- हॉंगकॉंग विरुद्ध युएई

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईची वन‌ फॅमिली बनली ग्लोबल! दक्षिण आफ्रिका आणि युएईतील फ्रॅंचाईजींच्या नावाची झाली घोषणा

रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर

घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवरही नेटकरी फिदा

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---