ऑगस्ट महिन्याअंती भारतीय संघाला संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक २०२२ खेळायचा आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी सोमवारी (०८ ऑगस्ट) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात विराट कोहली, केएल राहुल यांसारख्या अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. तर गोलंदाजी विभागात युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला गेला आहे.
टी२० आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) आवेश खान (Avesh Khan), अर्शदीप सिंग (Asrhdeep Singh), रवि बिश्नोई या युवा चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. तर अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांना दुखापतीमुळे आशिया चषकात जागा मिळालेली नाही. दरम्यान आशिया चषकासाठी निवडण्यात आलेले वेगवान गोलंदाजी आक्रमण किती मजबूत (Pace Bowling Attack) आहे?, याचा आढावा येथे घेण्यात आला आहे.
भारताचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्यामुळे आता भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आशिया चषकात भारताच्या वेगवान गोलंदाजी विभागाचे नेतृत्त्व करेल. भुवनेश्वर टी२० क्रिकेटमध्ये सातत्याने शानदार प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून देताना दिसत आहे. त्याने यावर्षी आतापर्यंत भारतीय संघाकडून टी२० १७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एकूण २० विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी १७.८० इतकी राहिली आहे.
तर युवा वेगवान गोलंदाज आवेश खान, अर्शदीप सिंग यांनीही मागील काही टी२० मालिकांमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यांत त्यांनी किफायतशीर गोलंदाजी केली आहे. आवेशने यावर्षी १३ टी२० सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत. तर अर्शदीपने ६ सामन्यांमध्ये ९ फलंदाजांना तंबूत धाडले आहे. त्यामुळे भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण मजबूत दिसत आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नशीबचं फुटके! चांगल्या प्रदर्शनानंतरही आशिया चषकातून बाहेर झाले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर
आशिया चषकाचा संघ समोर आल्यानंतर टी-२० विश्वचषकाचे चित्र स्पष्ट? वाचा कसा असेल संघ
INDvsPAK: पाकिस्तानचा सूड घेण्यास तयार आहेत भारत! आशिया चषकाच्या प्रोमोत दिसले रोहितचे रौद्ररूप